• Download App
    Hardeep Singh Puri

    Hardeep Singh Puri : शीखांबाबतच्या वक्तव्यावरून भाजप राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करणार!

    Hardeep Singh Puri

    केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकारपरिषद घेवून जाहीर केली भूमिका


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राहुल गांधींच्या ( Rahul Gandhi ) शिखांबाबतच्या वक्तव्यावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी त्यांच्या विदेश दौऱ्यात भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शिखांसाठी अनेक महत्त्वाची कामे केली असून शीख समाज देशात पूर्ण सन्मानाने जगत आहे आणि देशाला पुढे नेण्यात महत्त्वाचे योगदान देत असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

    करतारपूर कॉरिडॉर उघडल्यानंतर केंद्र सरकारने शिखांचा आदर वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. पक्षाच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधींनी परदेशात चुकीचे वक्तव्य करणे टाळावे. राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं पक्षाचे नेते सरदार आरपी सिंह  ( Hardeep Singh Puri ) यांनी म्हटलं आहे.



    केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, 1984 मध्ये सुनियोजित कटाचा भाग म्हणून शिखांचे हत्याकांड घडवण्यात आले होते. काँग्रेसचे अनेक बडे नेते यात सामील होते आणि या हल्ल्यांमध्ये 3000 हून अधिक शीख मारले गेल्याचे ते म्हणाले. यावर आपली चूक मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेते राहुल गांधी इतरांवरच प्रश्न उपस्थित करत आहेत. पुरी म्हणाले की, विरोधी पक्षनेते असल्याने त्यांच्याकडे घटनात्मक पद आहे. यानंतरही राहुल गांधी परदेशात भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी अशा कृती टाळाव्यात.

    भाजपचे शीख नेते सरदार आरपी सिंह म्हणाले की केंद्र सरकारने गुरुद्वारातील लंगरवरील कर माफ करण्यासह शीखांना सन्मान देण्यासाठी सर्व काम केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा गुरुद्वारामध्ये जातात तेव्हा ते पूर्ण भक्तीभावाने पगडी घालून डोके टेकवतात, तर या देशात असे पंतप्रधान झाले आहेत ज्यांनी शिखांच्या हत्याकांडाला योग्य म्हटलं होतं. राहुल गांधींनी अशी विधाने टाळण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा गांभीर्याने विचार करणार असल्याचे सरदार आरपी सिंह यांनी सांगितले.

    BJP will file a case against Rahul Gandhi for his statement about Sikhs

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai soldier : पाकविरोधात लढताना मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना उरीमध्ये लढताना वीरमरण

    Neeraj Chopra : आयपीएल नंतर आता ‘ही’ क्रीडा स्पर्धा देखील भारतात झाली स्थगित

    India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर