• Download App
    आनंद - उन्मादाची उकळी उतू गेली; अखिलेश म्हणाले, शेतकऱ्यांची पोकळ माफी मागणाऱ्यांनी (मोदींनी) राजकारणातून कायमचे निघून जावे!! । Happiness - the boil of mania overflowed; Akhilesh said, those who apologize to farmers (Modi) should leave politics forever !!

    आनंद – उन्मादाची उकळी उतू गेली; अखिलेश म्हणाले, शेतकऱ्यांची पोकळ माफी मागणाऱ्यांनी (मोदींनी) राजकारणातून कायमचे निघून जावे!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ /नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुरुनानक जयंती प्रकाश पर्व कार्तिक पौर्णिमेचे निमित्त साधत तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली काय, विरोधकांना आनंदाची उकळी फुटली…!! पण आता या उकळीचे उन्मादात रूपांतर झाले असून विरोधक पंतप्रधान मोदींवर बेछूट फैरी झाडत असल्याचे दिसत आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर याची प्रचिती येते. Happiness – the boil of mania overflowed; Akhilesh said, those who apologize to farmers (Modi) should leave politics forever !!

    प्रियांका गांधी यांनी मोदींवर टीका करताना शेतकऱ्यांना भाजपवाले शिव्या घालत होते. तेव्हा मोदी का गप्प बसले होते? शेतकऱ्यांना ते काय काय नाही म्हणालेत? चीन – पाकिस्तानचे हस्तक, नक्षलवादी, आन्दोलनजीवी. शेतकऱ्यांना त्यांनी काय काय नावे ठेवलीत!!, पण तेव्हा अहंकारी पंतप्रधान गप्प होते. राहुल गांधी यांनी देखील अशाच आशयाची टीका मोदींवर केली आहे. त्याला भूपेश बघेल, अशोक गहलोत या मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला आहे.

    पण या सगळ्यांच्या वरकडी केली आहे, ती समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी. उत्तर प्रदेशातून भाजप संपून जाईल. कारण त्यांनी शेतकऱ्यांचे बळी घेतले आहेत. आणि आता ते पोकळ माफी मागत आहेत. या पोकळ माफीने काहीही साध्य होणार नाही. उलट माफी मागणाऱ्या सर्व नेत्यांनी राजकारणातून कायमचे निघून जावे, असे वक्तव्य अखिलेश यादव यांनी केले आहे. तीन कृषी कायदे मागे घेतल्याच्या निमित्ताने सर्व विरोधक मोदींवर तुटून पडलेले असताना अखिलेश यादव यांनी त्यांना राजकारणातून कायमचे बाहेर काढण्याची भाषा केली आहे.

    नेमके इथेच आनंदाच्या उकळीचे उन्मादात रूपांतर झाल्याचे चिन्ह दिसत आहे. विरोधकांनी आपल्या आनंदाची उकळी वेळीच आवरली नाही तर हा उन्माद आणखी वाढायला वेळ लागणार नाही. तो आवरणे विरोधकांना कठीण जाईल आणि कदाचित हेच मोदींना हवे असावे. शेतकरी आंदोलन येत्या काही दिवसात संपेल किंवा संपवावे लागेल आणि मग विरोधकांकडे कोणता मुद्दा होणार नाही. विरोधकांना आपल्या सगळ्या टीकेच्या बंदुकीच्या फैरी फक्त मोदींवर झाडाव्या लागतील आणि इथेच पंजाब, उत्तर प्रदेश सर्व राज्यांची निवडणूक पुन्हा एकदा “मोदी केंद्रित” होईल. तेव्हा मोदी आपल्या भात्यातून कोणती शस्त्र बाहेर काढतील हे पाहणे महत्त्वाचे आहे…!!

    Happiness – the boil of mania overflowed; Akhilesh said, those who apologize to farmers (Modi) should leave politics forever !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते