उच्च न्यायालयाने ममता सरकारला सुनावले खडेबोल
विशेष प्रतिनिधी
कोलाकाता : हावडा, हुगळी आणि बंगालमधील इतर ठिकाणी रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी टिप्पणी केली. राज्य सरकारला ताकीद देताना, प्रभारी मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवगणम यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर राज्य पोलीस परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत असतील, तर केंद्रीय दलांची मदत घ्यावी. हुगळी जिल्ह्यातील रिसडा येथे झालेल्या हिंसाचारावर विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हनुमान जयंतीला राज्यात हिंसाचार होण्याची भीती व्यक्त केली होती. Hanuman Jayanti Three units of Central Force deployed on Hanuman Jayanti in West Bengal
त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्यातील कोलकाता, हुगळी आणि बराकपूर येथे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रामनवमीचा संदर्भ देत खंडपीठाने सांगितले की, भूतकाळातील घटनांमधून धडा घेतला पाहिजे. याशिवाय रोगाराईबाबत आगाऊ प्रतिबंध करणे फार महत्वाचे आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
याशिवाय न्यायालयाने म्हटले की, हनुमान जयंतीला हिंसाचार होता कामा नये, यासाठी जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी रूट मार्च काढावा. मुंबईचे उदाहरण देताना न्यायमूर्ती म्हणाले की, गणेश चतुर्थीच्या वेळी पोलीस बॅरिकेड्स लावून मिरवणुका काढल्या जातात आणि कुठेही गोंधळ होत नव्हता. तसेच, ज्याठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे तिथून मिरवणूक काढू नये आणि हनुमान जयंतीबाबत कोणताही राजकीय नेता कुठेही वक्तव्य करणार नाही. असेही न्यायाधीशांनी म्हटले आहे. तर अॅडव्होकेट जनरल एसएन मुखर्जी यांनी न्यायालयात सांगितले की, पोलिसांना राज्यात हनुमान जयंतीनिमित्त रॅली आयोजित करण्यासाठी सुमारे २ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
Hanuman Jayanti Three units of Central Force deployed on Hanuman Jayanti in West Bengal
महत्वाच्या बातम्या
- सावरकर गौरव यात्रा : मी फडतूस नाही काडतूस, झुकेगा नही घुसेगा; देवेंद्र फडणवीसांचा प्रहार–
- ‘’उद्धव ठाकरे… फडतूस नही काडतूस हू मै, झुकेंगा नही साला घुसेंगा’’ देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा!
- Covid19 : महाराष्ट्रात मागील २४ तासांत करोना संसर्गाचे ७११ नवीन रुग्ण, चार जणांचा मृत्यू
- China Arunachal rename: चीनकडून कुरापती सुरूच; आता अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावे बदलली!