• Download App
    "हमारा बजाज" : सामान्य भारतीयांचे स्कूटरचे स्वप्न पूर्ण करणारे जेष्ठ उद्योजक राहुल बजाज कालवश|"Hamara Bajaj": Rahul Bajaj, a senior entrepreneur who fulfilled the dream of ordinary Indians for a scooter

    “हमारा बजाज” : सामान्य भारतीयांचे स्कूटरचे स्वप्न पूर्ण करणारे जेष्ठ उद्योजक राहुल बजाज कालवश

    प्रतिनिधी

    मुंबई : “हमारा बजाज” असे म्हणत सर्वसामान्य भारतीयांचे वाहनाचे स्वप्न पूर्ण करणारे देशातील अग्रगण्य उद्योजक राहुल बजाज यांचे शनिवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेल्या ५ दशकांमध्ये बजाज उद्योग समूहाला सर्वसामान्यांच्या स्वप्नांची पूर्ती करणारा उद्योग समूह म्हणून नावारूपाला आणण्यात आणि ‘मबजाज ऑटोला दुचाकी- तीन चाकी वाहन क्षेत्रात सर्वोच्च कंपनी बनवण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे.”Hamara Bajaj”: Rahul Bajaj, a senior entrepreneur who fulfilled the dream of ordinary Indians for a scooter

    दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी राहुल बजाज यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते देशाचे औद्योगिक धोरण ठरविण्यात देखील त्यांचा मोलाचा वाटा होता.राहुल बजाज यांच्या पश्चात दोन मुले राजीव आणि संजीव आणि एक मुलगी सुनैना केजरीवाल असा परिवार आहे.



    राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला होता. तर अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण आणि हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चे शिक्षण त्यांनी घेतले होते. शिक्षणानंतर ते १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात उभं करण्यात त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. अनेक सर्वसामान्यांसाठी त्यांनी दुचाकीचे स्वप्न पुर्ण केले. तर स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्यांनी तीन चाकीचे ही स्वप्न पूर्ण केले.

    गतवर्षीच राहुल बजाज यांनी कंपनीच्या संचालक आणि अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्यांचे चुलत भाऊ नीरज बजाज यांच्याकडे ‘बजाज’ची सर्व सूत्रे सोपविण्यात आली होती. राहुल बजाज १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सूत्रे स्वीकारली होती.

    यानंतर राहुल यांनी स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन २००८ मध्ये बजाजने सुमारे १० हजार कोटींची उलाढाल गाठली. त्यांच्या याच प्रयत्नांमुळे २००१ साली राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

    “Hamara Bajaj”: Rahul Bajaj, a senior entrepreneur who fulfilled the dream of ordinary Indians for a scooter

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे