• Download App
    मतदानाआधी तीन दिवस शिवसेनेचे एकमेव स्टार प्रचारक आदित्य ठाकरे प्रचारासाठी गोव्यात; राजकीय घराण्यांचे केले समर्थन!!|Three days before the polls, Shiv Sena's lone star campaigner Aditya Thackeray is in Goa for campaigning; Support from political families

    मतदानाआधी तीन दिवस शिवसेनेचे एकमेव स्टार प्रचारक आदित्य ठाकरे प्रचारासाठी गोव्यात; राजकीय घराण्यांचे केले समर्थन!!

    प्रतिनिधी

    पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीतील मतदानाला अवघे तीन दिवस उरले असताना शिवसेनेचे एकमेव स्टार प्रचारक महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले.त्यांनी साखळी काल एक प्रचार सभा घेतली. काही ठिकाणी घरोघर जाऊन शिवसेनेची शिवसेनेचा प्रचार केला आणि आज पत्रकार परिषद घेतली.Three days before the polls, Shiv Sena’s lone star campaigner Aditya Thackeray is in Goa for campaigning; Support from political families

    या पत्रकार परिषदेत त्यांनी घराणेशाही संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना एखाद्या राजकीय घराण्यातील अनेक व्यक्तींना राजकारणाची आवड असेल तर त्यांनी राजकारणात यायला अडचण काय आहे?, असा सवाल त्यांनी केला आहे. राजकीय घराण्यातील व्यक्तींचा जनसंपर्क कसा आहे लोकांशी ते कसे बोलतात कसे वागतात हे पाहायला पाहिजे आणि शेवटी त्यांना निवडून लोकप्रतिनिधी बनवायची की नाही हे जनतेच्या हातात असते असेही आदित्य ठाकरे म्हणाले.



    साखळी येथे एका बंद सभागृहात घेतलेल्या प्रचार सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले मी गोव्यात प्रचाराला आलो, तेव्हा मला वेगळीच शंका वाटू लागली. महाराष्ट्रातून प्रचारासाठी गोव्याला आलेले सेना नेते हे पुन्हा महाराष्ट्रात परतणार का?, अशी आपल्याला शंका येऊ लागली आहे, धाकधूक वाटत आहे.

    कारण आपले या राज्याशी नाते वेगळे आहे. आपले कुलदैवत या राज्यात आहे, असेही शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले. प्रत्येक राज्याची विशिष्ट ओळख असते. ज्या राज्यात जाऊ तेथील स्थानिक भूमीपूत्रांना न्याय देऊ, तसे स्थानिक गोवेकरांनाही प्राधान्य देऊ, हा सेनेचा गोवेकरांना शब्द आहे, असेही ठाकरे म्हणाले.

    भाजपाने गोव्यासाठी काही केले नाही

    महाराष्ट्र मॉडेल म्हणून चर्चेत आहे, कारण सलग २ वर्षे उद्धव ठाकरे यांचा देशातील टॉप फाइव्हमध्ये समावेश आहे. गोव्यात फाइव्ह स्टार हॉटेल आहेत, बंगले आहेत, पण लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. मागील १० वर्षे गोव्यात भाजपाची सत्ता आहे, वरती आणि खाली सरकार असूनही गोव्यासाठी काही केले नाही. गोव्यात फाइव्ह स्टार हॉटेल आहेत, बंगले आहेत, पण पाणी नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

    Three days before the polls, Shiv Sena’s lone star campaigner Aditya Thackeray is in Goa for campaigning; Support from political families

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांच्या माढा मोहिमेनंतर फडणवीसांची स्वारी; फेरमांडणी करून “मोदी है तो मुमकिन है” ची कसून पूर्वतयारी!!

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता