• Download App
    निवडणूक जल्लोषावर निर्बंध घाला, पोटनिवडणुका सहा महिने लांबणीवर टाका-देवेगौडांचे मोदींना साकडे।H.D. Devegowda writes letter to PM Modiji

    निवडणूक जल्लोषावर निर्बंध घाला, पोटनिवडणुका सहा महिने लांबणीवर टाका-देवेगौडांचे मोदींना साकडे

    वृत्तसंस्था

    बंगळूर : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पाठोपाठ आता आणखी एका माजी पंतप्रधानांनी कोरोनाच्या मुकाबल्यासाठी केंद्राला सुचना केल्या आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निवडणुकीतील विजयाच्या जल्लोषावर निर्बंध घातले जावेत आणि सर्व पोटनिवडणुका तसेच स्थानिक निवडणूका सहा महिने लांबणीवर टाकाव्यात असे आवाहन माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केले आहे. H.D. Devegowda writes letter to PM Modiji



    तुमची श्रद्धा आणि पंथ कोणताही असला तरी विज्ञानाचे स्थान त्यापेक्षा उच्च असले पाहिजे, असे देवेगौडा यांनी नमूद केले आहे. देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून अनेक सूचना केल्या आहेत. देवेगौडा यांनी म्हटले आहे की, यंदा मे महिन्यानंतर कोणत्याही राज्यातील विधिमंडळाचा कार्यकाळ संपुष्टात येणार नाही. दरम्यानच्या कालावधीत निवडणूक आयोगाने सुरक्षित निवडणूक प्रक्रियेसाठी नवे नियम बनवावेत. त्याचवेळी दुसरीकडे लसीकरण मोहिमेलाही वेग देण्यात यावा.

    कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर जनतेमध्ये बराच गोंधळ माजला आहे. पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या अनेकांना संसर्ग झाला असल्यामुळे लसीचा धिक्कार करण्याचा दृष्टिकोन बळावत आहे. अशावेळी स्वतःचा आणि दुसऱ्याचाही जीव वाचविण्याचा लस हाच सर्वोत्तम उपाय असल्याचा सुस्पष्ट संदेश ठामपणे दिला जावा.

    H.D. Devegowda writes letter to PM Modiji

    Related posts

    Shubanshu Shukla : शुभांशू शुक्ला अवकाशात पोहोचणारे ६३४ वे अंतराळवीर बनले

    Operation Deep Impact : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानविरुद्ध भारताचे ‘ऑपरेशन डीप इम्पॅक्ट’ सुरू

    काँग्रेसने स्वतःच केली शशी थरूर यांची वजाबाकी, पण नुसते भाजपला बोल लावण्यात काय हाशील??