• Download App
    गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेस पासून मार्ग वेगळा??; जी 23 नेत्यांमध्ये देखील फूट...?? |Gulam nabi azad to part ways from congress??; split in G 23 leaders??

    गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेस पासून मार्ग वेगळा??; जी 23 नेत्यांमध्ये देखील फूट…??

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील जी 23 गटाचे प्रमुख नेते आपल्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरीस वेगळा डाव करण्याच्या विचारात आहेत. काँग्रेसपासून वेगळे होऊन ते कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासारखाच नवा पक्ष स्थापन करतील,Gulam nabi azad to part ways from congress??; split in G 23 leaders??

    अशी राजकीय वर्तुळात मोठ्याप्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.गुलाम नबी आझाद हे सध्या जम्मू – काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. पूंच, राजौरी आदी शहरांमध्ये त्यांनी जाहीर सभांना संबोधित केले आहे. त्यावेळी त्यांनी केलेली भाषणे राजकीय दृष्ट्या सूचक असल्याचे बोलले जाते. त्यांनी सुरक्षा दलांची स्तुती केली आहे.



    जम्मू-काश्मीर मधून दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी सुरक्षा दले उत्तम काम करत आहेत. त्यांना काश्मिरी जनतेने सहकार्य केले पाहिजे. सुरक्षा दलांनी देखील काश्मिरी जनतेच्या सहकार्याने दहशतवाद्यांशी मुकाबला केला पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

    त्याच बरोबर काँग्रेसला 2024 च्या निवडणुकीत 300 जागा मिळणे शक्य नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीर मध्ये पुन्हा 370 कलम आणि 35 हे उपकलम लागू होण्याची आशा उरलेली नाही.

    त्याऐवजी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात लवकरात लवकर राज्याचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे. त्यांची ही वक्तव्ये केंद्रातल्या भाजप सरकारला अनुकूल असल्याचे मानले जात आहे.

    त्याचबरोबर गुलाम अहमद मीर या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष यांच्याविरोधात आझाद गटाच्या २० नेत्यांनी काँग्रेसचे नुकतेच राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गुलाम नबी आझाद यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याकडे पाहिले जात आहे.

    कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासारखाच गुलाम नबी आझाद यांनी देखील जर वेगळा मार्ग चोखाळला तर ती फक्त काँग्रेसमध्ये फूट नसेल तर काँग्रेसमध्ये राहून पक्षनेतृत्वाशी संघर्ष करणाऱ्या जी 23 गटामध्ये देखील ती फूट असेल.

    कारण आत्तापर्यंत जी 23 गटाच्या सर्व नेत्यांनी काँग्रेसमध्ये राहूनच नेतृत्वाशी मर्यादित अर्थाने संघर्ष करण्याची भूमिका ठेवली होती. परंतु त्या गटाचे प्रमुख नेते गुलामनबी आझाद हेच जर बाहेर पडणार असतील तर जी 23 गटही फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत भविष्यकाळात काँग्रेसला आणखी किती फुटींना सामोरे जावे लागेल?, याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

    Gulam nabi azad to part ways from congress??; split in G 23 leaders??

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य