• Download App
    Gulam Nabi Azad : जातीवादाच्या अतिरेकामुळे चांगल्या नेत्यांना प्रचारात संधी नाही; गुलाम नबी आझादांची स्पष्टोक्ती । Gulam Nabi Azad: Extremist racism does not give good leaders a chance to campaign; Ghulam Nabi Azad's outspokenness

    Gulam Nabi Azad : जातीवादाच्या अतिरेकामुळे चांगल्या नेत्यांना प्रचारात संधी नाही; गुलाम नबी आझादांची स्पष्टोक्ती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात निवडणुकीच्या राजकारणात जातीवादाचा अतिरेक झाला आहे. त्यामुळे चांगल्या नेत्यांना अथवा वक्त्यांना प्रचाराची जबाबदारी कोणताच राजकीय पक्ष देत नाही, अशी स्पष्टोक्ती काँग्रेसच्या जी 23 गटाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. Gulam Nabi Azad: Extremist racism does not give good leaders a chance to campaign; Ghulam Nabi Azad’s outspokenness

    जी 23 गटाने काँग्रेस अंतर्गत सामूहिक नेतृत्वासाठी आवाज उठवला आहे. पण हे नेते काँग्रेसच्या प्रचारात कोठेच का दिसत नाहीत? असा सवाल नेहमी करत करण्यात येतो. गुलाम नबी आझाद यांनी या सवालाचे उत्तर दिले आहे. आझाद म्हणाले, की देशात राजकारणात जातीवादाचा अतिरेक झाला आहे. त्यामुळे चांगल्या नेत्यांना कोणताच राजकीय पक्ष प्रचाराची जबाबदारी देत नाही. राजकीय पक्षांनी हिंदू एरिया, मुस्लिम एरिया, ब्राह्मण एरिया, रजपूत एरिया, दलित एरिया अशी समाजाची वाटणी करून टाकली आहे. त्यामुळे त्या एरियात प्रचार कोण करणार तर त्या जातीचाच नेता अथवा वक्ता लागतो.



    त्यामुळे काँग्रेससह सर्वच पक्षांमधले चांगले नेते आणि कार्यकर्ते प्रचारातून डावलले जातात. काँग्रेससह सर्वच पक्ष समाजाची वाटणी जात आणि धर्म यांच्यावर आधारित करताना दिसतात, असे शरसंधान गुलाब नबी आझाद यांनी साधले आहे. काँग्रेसचे निष्ठावंत असणाऱ्या जी 23 गटाचा आवाज म्हणजे विवेक बुद्धीचा आवाज आहे. आणि काँग्रेसमध्ये तो ऐकला जातो. पण त्यावर अंमलबजावणी केली जात नाही, अशी खंत आझाद यांनी व्यक्त केली आहे.

    Gulam Nabi Azad : Extremist racism does not give good leaders a chance to campaign; Ghulam Nabi Azad’s outspokenness

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य