सुरत न्यायालयाने ‘मोदी आडनाव’ बदनामी प्रकरणात राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता.
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालय आज (शनिवार) सुरत न्यायालयाच्या आदेशाविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अपीलावर सुनावणी करणार आहे. सुरत न्यायालयाने गेल्या आठवड्यात 2019 च्या ‘मोदी आडनाव’ बदनामी प्रकरणात त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. हायकोर्टाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या कारण यादीनुसार, न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक राहुल गांधींच्या अपीलावर सुनावणी करणार आहेत. Gujarat High Court to hear Rahul Gandhis petition today
23 मार्च रोजी, सुरत येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी ‘मोदी आडनाव’ बद्दल केलेल्या टिप्पणीसाठी गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात गांधींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दोषी आढळल्यामुळे, गांधी यांना 24 मार्च रोजी केरळमधील वायनाडमधून लोकसभा खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले.
राहुल गांधी 3 एप्रिल रोजी, या निकालाविरुद्ध गुजरत सत्र न्यायालयात अपील दाखल केले आणि नंतर त्यांचे अपील निकाली काढण्यासाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 20 एप्रिल रोजी न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली होती. यानंतर राहुल गांधी यांनी शिक्षेला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात अपील दाखल केले.
Gujarat High Court to hear Rahul Gandhis petition today
महत्वाच्या बातम्या
- कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोप प्रकरणी ब्रिजभूषण सिंह विरोधात दोन FIR दाखल!
- बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध पॉक्सोसह 2 गुन्हे दाखल; कुस्तीपटू म्हणाले, अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील
- ‘’मागच्या जन्मीचं पुण्य आज माझ्या कामी येतय’’ मॉरिशसमध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणानंतर फडणवीसांचे उद्गार!
- कुस्तीगीर ते बारसू : नवे शेतकरी आंदोलन “इन मेकिंग”!!