• Download App
    गुजरात निवडणूक : आम आदमी पक्षाकडून जोरदार तयारी, 10 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध|Gujarat Election: Aam Aadmi Party released first list of 10 candidates

    गुजरात निवडणूक : आम आदमी पक्षाकडून जोरदार तयारी, 10 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : आम आदमी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पहिल्या यादीत 10 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. उमेदवारांमध्ये पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. यात भीमाभाई चौधरी यांना देवदर, जगमाल वाला यांना सोमनाथ, अर्जुन राठवा यांना छोटा उदयपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. राजकोट दक्षिणमधून शिवलाल बरसिया, राजकोट ग्रामीणमधून वशराम सगठिया यांना संधी देण्यात आली आहे.Gujarat Election: Aam Aadmi Party released first list of 10 candidates

    दरम्यान, आम आदमी पक्षाने गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी गुजरात दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी विधानसभा निवडणुकांसाठी गुजरातेत आश्वासने दिली. केजरीवाल म्हणाले की, आज तुम्हाला गॅरंटी देत आहे की, जे बोलत आहे ते करून दाखवेन. त्यांनी म्हटले की, जर 5 वर्षांत बोललो तसे केले नाही तर धक्के मारून बाहेर काढा.



    दिल्लीचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मी रोजगाराची गॅरंटी देत आहे. यासोबतच केजरीवालांनी आपल्या विरोधकांवरही निशाणा साधला. अरविंद केजरीवाल यांनी आपली गॅरंटी सादर करत 5 वर्षांच्या दरम्यान बेरोजगारांना रोजगार देण्याचे, रोजगार मिळेपर्यंत 3 हजार रुपये बेरोजगारी भत्ता, 10 लाख सरकारी नोकऱ्यांची भरती, पेपर लीकसाठी कठोर कायदा आणि सहकाराच्या क्षेत्रात नोकऱ्यांची पद्धत दुरुस्त करून ती पारदर्शक करण्याचे आश्वासन दिले आहे.

    Gujarat Election: Aam Aadmi Party released first list of 10 candidates

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार