• Download App
    ' पक्षाची विचारधारा देशविरोधी' म्हणत गुजरात काँग्रेसचे आमदार चिराग पटेल यांचा राजीनामा!|Gujarat Congress MLA Chirag Patel resigns saying the ideology of the party is anti national

    ‘ पक्षाची विचारधारा देशविरोधी’ म्हणत गुजरात काँग्रेसचे आमदार चिराग पटेल यांचा राजीनामा!

    काँग्रेस नेत्यांकडे सकारात्मक दृष्टिकोन नाही, असंही ते म्हणाले


    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : गुजरातमधील खंभातमधील काँग्रेस आमदार चिराग पटेल यांनी विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस नेत्यांवर टीका केली.Gujarat Congress MLA Chirag Patel resigns saying the ideology of the party is anti national

    खंभात काँग्रेस आमदारपदाचा राजीनामा सादर केल्यानंतर चिराग पटेल म्हणाले, “काँग्रेसमधून राजीनामा देण्याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे पक्षाची विचारधारा देशाच्या विरोधात आहे. काँग्रेस नेत्यांकडे सकारात्मक दृष्टिकोन नाही.”



    २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने खंभात जागा जिंकली. 1990 नंतर प्रथमच खंभातमध्ये काँग्रेसचा विजय झाला. २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसने चिराग पटेल यांना तिकीट दिले होते.

    भाजपने त्यांच्या विरोधात महेश रावल यांना उमेदवारी दिली होती, ज्यामध्ये चिराग पटेल यांना ६९,०६९ तर महेश रावल यांना६५,३५८ मते मिळाली. चिराग पटेल ३७११ मतांनी विजयी झाले होते.

    Gujarat Congress MLA Chirag Patel resigns saying the ideology of the party is anti national

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!