विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरातमधील मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गृहविभागासह १० खात्यांचा कार्यभार स्वत:कडे ठेवला आहे. कनूबाई देसाई यांच्याकडे अर्थ, उर्जा आणि पेट्रोकेमिकल्स या महत्वाच्या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.Gujarat Chief Minister Bhupendra Patel retains the Home Department
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी धक्कातंत्राचा वापर करत संपूर्ण मंत्रीमंडळाची नव्याने फेररचना केली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी १० कॅबिनेट मंत्री आणि १४ राज्यमंत्र्यांना शपथ दिली. पाच राज्यमंत्र्यांकडे स्वतंत्र कार्यभार आहे.
मंत्रीमंडळाच्या गुरूवारी झालेल्या पहिल्याच बैठकीत खातेवाटप करण्यात आले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे गृह विभागासोबतच सामान्य प्रशासन विभाग, माहिती आणि प्रसारण, उद्योग, खाणी आणि खनिजे, भांडवली प्रकल्प, शहरी विकास, शहरी गृहनिर्माण व नर्मदा आणि बंदरे यांची जबाबदारी असेल.
पारडीचे आमदार कनुभाई देसाई यांच्याकडे अर्थ, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स खात्यांची वाटप करण्यात आली आहेत. मागील सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्ष असलेले राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे महसूल, कायदा आणि न्याय आणिआणि संसदीय कामकाज विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नवे शिक्षणमंत्री भावनगर पश्चिमचे आमदार जितू वाघानी असतील. विसनगरचे आमदार ऋषिकेश पटेल यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण यासोबतच जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभाग देण्यात आला आहे. सुरत पश्चिमचे आमदार पूर्णेश मोदी रस्ते आणि इमारत, वाहतूक, नागरी उड्डाण, पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास सांभाळतील.
जामनगर ग्रामीणचे आमदार राघवजी पटेल शेती आणि पशुसंवर्धन विभागाचे मंत्री असतील. लिंबडीचे आमदार किरितसिंह राणा यांना वन, पर्यावरण, हवामान बदल यांची जबाबदारी आहे. गांदेवीचे आमदार नरेश पटेल आदिवासी विकास आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग सांभाळतील.
आसरवाचे आमदार प्रदीप परमार सामाजिक न्याय मंत्री असतील. अर्जुनसिंह चौहान ग्रामविकास आणि ग्रामीण गृहनिर्माण विभाग देण्यात आला आहे. मंत्रीमंडळातील सर्वात तरुण चेहरा असलेल्या हर्ष संघवी यांच्याकडे गृह, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस गृहनिर्माण विभागाचे राज्य मंत्री असतील.
Gujarat Chief Minister Bhupendra Patel retains the Home Department
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : भारताचे स्टॉक मार्केट जगातील 5वे सर्वात मोठे, BSE लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 260 लाख कोटी रुपयांवर
- Aukus : अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाची नवीन ‘सुरक्षा युती’ची घोषणा, फ्रान्सला धक्का, तर चीनची तिन्ही देशांवर आगपाखड
- चीनमध्ये 6.0 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप, अनेक घरे कोसळली, 3 जणांचा मृत्यू, 60 जण जखमी
- Virat Kohli : कर्णधारपदी असताना देशात एकही टी-20 सिरीज गमावली नाही, असा होता विराट कोहलीचा टी-२० प्रवास