• Download App
    GST Collections : जीएसटी कलेक्शनमध्ये 33 % उसळी, पुन्हा एकदा आकडा 1 लाख कोटींच्या पुढे । GST collection in July at over 1.16 lakh crore rupees

    GST Collection : जीएसटी कलेक्शनमध्ये ३३ % उसळी, पुन्हा एकदा आकडा 1 लाख कोटींच्या पुढे

    GST Collection : जुलै महिन्यात सरकारी तिजोरीत गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सचे 1 लाख 16 हजार 393 कोटी रुपये आले आहेत. जुलै 2020 च्या तुलनेत यामध्ये 33 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जुलै 2020 मध्ये जीएसटी कलेक्शन 87,422 कोटी रुपये होते. यात CGST 16,147 कोटी, SGST 21,418 कोटी आणि IGST 42,592 कोटी होते. GST collection in July at over 1.16 lakh crore rupees


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जुलै महिन्यात सरकारी तिजोरीत गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सचे 1 लाख 16 हजार 393 कोटी रुपये आले आहेत. जुलै 2020 च्या तुलनेत यामध्ये 33 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जुलै 2020 मध्ये जीएसटी कलेक्शन 87,422 कोटी रुपये होते. यात CGST 16,147 कोटी, SGST 21,418 कोटी आणि IGST 42,592 कोटी होते.

    जुलै 2021 च्या जीएसटी कलेक्शनमध्ये स्टेट जीएसटी (SGST) 28541 कोटी, सेंट्रल जीएसटी (CGST) 22197 कोटी आणि IGST 57864 कोटी आहे. IGST मध्ये 27,900 कोटी इम्पोर्टमुळे आले आहेत. सेसमध्ये 7,790 कोटी आले ज्यापैकी 815 कोटी आयात केलेल्या वस्तूंवरील सेसमधून आले आहेत. जीएसटीचे हे कलेक्शन 1 जुलै ते 31 जुलैदरम्यान GSTR-3B फायलिंगच्या माध्यमातून झाले आहे. याच्या शिवाय यादरम्यान इम्पोर्टेड गुड्सवर वसूल केलेल्या IGST आणि सेसचाही यात समावेश करण्यात आला आहे.

    सलग आठ महिन्यांपर्यंत GST collection एक लाख कोटींच्या पुढे राहिले होते, परंतु जूनच्या महिन्यात हे एक लाख कोटींच्या खाली घसरले होते. जून महिन्यात जीएसटी कलेक्शन 92,849 कोटी राहिले होते. यामध्ये CGST चे 16,424 कोटी, SGST चे 20,397 कोटी आणि IGST च्या 49,079 कोटी रुपयांचा समावेश होता.

    एप्रिल आणि मे महिन्यात पूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू होती, यामुळे जूनमध्ये जीएसटी कलेक्शन घसरले होते. या कारणामुळे स्थानिक पातळीवर जवळपास संपूर्ण देशातच लॉकडाउन लागलेले होते. जुलैमध्ये यात दिलासा मिळाला, ज्यामुळे जीएसटी कलेक्शनही वाढले आहे. यावरून हे कळते की, अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा वेग धारण केला आहे.

    GST collection in July at over 1.16 lakh crore rupees

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’