वृत्तसंस्था
सिडनी : भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या भारतीय बनावटीच्या कोरोना लशीच्या वापरास ऑस्ट्रेलियाने सोमवारी हिरवा कंदील दाखविला आहे. प्रवाशांचे लसीकरण झाल्याचे निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलियात कोव्हॅक्सिनला मंजुरी दिल्याचे तेथील सरकारने स्पष्ट केले. Green flag for use of India Biotech’s ‘covacin’ vaccine; Not yet approved by the WHO
कोव्हॅक्सिन ही लस हैदराबाद येथील भारत बायोटेकने विकसित आणि उत्पादित केली आहे. भारतात कोव्हॅक्सिन आणि अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोव्हिशिल्ड या दोन लशींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. कोव्हिशिल्डला ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच मंजुरी दिली.
ऑस्ट्रेलियाने कोव्हॅक्सिनबरोबरच ‘बीबीआयबीपी-कोरव्ही’ या सिनोफार्म कंपनीने विकसित केलेल्या चिनी लशीलाही मंजुरी दिली. १२ वर्षांपुढील प्रवाशांनी कोव्हॅक्सिन आणि १८ ते ६० वयोगटातील प्रवाशांनी ‘बीबीआयबीपी-कोरव्ही’ लस घेतली असल्यास त्यांचे लसीकरण झाल्याचे मानण्यात येईल, असे ऑस्ट्रेलियाच्या रोगनिवारक वस्तू प्रशासनाने (टीजीए) स्पष्ट केले.
कोव्हॅक्सिन (भारत बायोटेक), बीबीआयबीपी-कोरव्ही (सिनोव्हॅक, चीन) आणि कोव्हिशिल्ड (अॅस्ट्राझेनेका, भारत) यांना मान्यता दिल्यामुळे या लशी घेतलेले भारतीय, चिनी यांसह अन्य देशांतील नागरिकांना ऑस्ट्रेलियात लसीकरण झालेले प्रवासी समजण्यात येईल, असे ऑस्ट्रेलियन प्रशासनाने सांगितले. या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियात परतू इच्छिणारे परदेशी विद्यार्थी, कुशल आणि अकुशल कामगारांच्या मार्गातील अडथळा दूर झाल्याचेही ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाने कोव्हॅक्सिनला अजुनही जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरास मंजुरी दिलेली नाही. या लशीची परिमाणकारकता आणि सुरक्षितता निश्चित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठवड्यात भारत बायोटेकला आणखी काही माहिती सादर करण्यास सांगितले होते. या लशीच्या मंजुरीबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत निर्णयाची शक्यता आहे.
Green flag for use of India Biotech’s ‘covacin’ vaccine; Not yet approved by the WHO
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान