वृत्तसंस्था
तिरुअनंतपुरम : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवणाऱ्या राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर बाकीचे राजकीय परिणाम दिसलेच आहेत. पण त्या पलीकडे जाऊन आता केरळ मधल्या डाव्या सरकारने खासदार म्हणून राहुल गांधींना वैयक्तिक सेवेसाठी दिलेले दोन कर्मचारी काढून घेतले आहेत.government of Kerala sacked two employees given to Rahul Gandhi!!
राहुल गांधींच्या सेवेत असणारे वाहन चालक मोहम्मद रफी आणि त्यांचे केरळ पुरते खाजगी सचिव रतिष कुमार यांना राहुल गांधींच्या सेवेतून दूर करण्यात आले आहे. त्यांची ओळखपत्रे सरकारी कार्यालयाकडे जमा करण्याचे आदेश या दोघांनाही बजावण्यात आले आहेत.
देशातले सर्व चोर मोदी कसे?, असा सवाल राहुल गांधींनी एका सभेत केला होता. त्यावर मोदी नामक एका व्यक्तीने सुरत कोर्टात केस दाखल केली होती. या केसचा निकाल देताना सुरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवले होते. कोर्टाने दोषी ठरवल्यामुळे लोकसभा सचिवालयाने नियमानुसार त्यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे राहुल गांधी हे केरळ मधल्या वायनाडचे काँग्रेसचे लोकप्रतिनिधी उरले नाहीत. त्यामुळे आता केरळ सरकारने राहुल गांधींना खासदार म्हणून दिलेले दोन कर्मचारी त्यांच्या सेवेतून दूर केले आहेत.
राहुल गांधींची खासदारकी नियमानुसार रद्द झाली असली तरी काँग्रेसने मात्र त्या मुद्द्यावर देशभरात भाजप विरुद्ध मोठा गदारोळ करून रान उठविले होते. पण आता मात्र त्यांच्या सेवेतले दोन सरकारी कर्मचारी दूर करण्याचा निर्णय भाजपने नव्हे, तर केरळ मधल्या डाव्या पक्षांच्या सरकारने घेतला आहे.
government of Kerala sacked two employees given to Rahul Gandhi!!
महत्वाच्या बातम्या
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले – मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार, कधी होणार हे मुख्यमंत्री ठरवतील
- 4 दिवस उशिराने केरळमध्ये येणार मान्सून, महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा, मध्यप्रदेशसह 6 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर
- ”देशात पर्यावरणपूरक राजकारण व्हायला हवं”, राज ठाकरेंचं विधान!
- राष्ट्रवादीची आली पंचविशी, मुख्यमंत्री राहू द्या, मनातला पक्षाध्यक्ष नेमण्यात पवार होणार का यशस्वी??