वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमानसेवा १५ डिसेंबरपासून पूर्ववत सुरु होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरांपासून ती बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरु होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. Government has allowed the resumption of scheduled commercial international passenger services wef 15 Dec 21.
- पुणे-दुबई विमानसेवा सुरू; दीड वर्षांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाणे सुरु झाल्याने दिलासा
केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे आता १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला. केंद्रीय गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच नागरी हवाई वाहतूक सचिव राजीव बन्सल यांनी आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा लवकरच पूर्ववत होण्याचे संकेत दिले होते.
- केव्हा झाली बंद : २२ मार्च २०२० पासून
- स्थगितीची मुदत : ३० नोव्हेंपर्यंत वाढवण्यात आली
- ‘एअर बबल’ व्यवस्था : २५ हून अधिक देशांसोबत आहे. दोन देशांमधील विमान कंपन्या काही अटींच्या अधीन राहून एकमेकांच्या
- भूप्रदेशात विमानांचे संचालन करू शकतात.
- केव्हा सुरु होणार : १५ डिसेंबरपासून
Government has allowed the resumption of scheduled commercial international passenger services wef 15 Dec 21.
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : मेंदूची अंतर्गत क्लिष्ट रचना एखाद्या भव्य कारखान्यासारखीच
- लाईफ स्किल्स : शरीरसंपदेसाठी आहारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने वाढवा
- वर्षा गायकवाड : पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश ,विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची अडचण दूर होणार
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : संगणकही शिकणार आता माणसाची भाषा