• Download App
    रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्लॅटफॉर्म तिकीटात कपात; आता १० रुपयेच द्यावे लागणार। Good news for train passengers, reduction in platform tickets; Now you have to pay only 10 rupees

    रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्लॅटफॉर्म तिकीटात कपात; आता १० रुपयेच द्यावे लागणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारणप्लॅटफॉर्म तिकिटात मोठी कपात केली आहे. आता प्रवाशांना ५० रुपयाऐवजी केवळ १० रुपयेच द्यावे लागणार आहेत. Good news for train passengers, reduction in platform tickets; Now you have to pay only 10 rupees

    कोरोना काळात रेल्वेने काही महत्वाच्या स्टेशनवर गर्दी होऊ नये, यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये केले होते. प्रवाशांना स्टेशनवर सोडण्यासाठी त्याचे नातेवाईक येत आल्याने गर्दी वाढून कोरोना संसर्ग फैलावेल अशी धास्ती होती. त्यामुळे खबरदारी म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ केली होती. ती आता कोरोनाचे संकट दूर होत असल्याने मागे घेतली आहे.



    प्लॅटफॉर्म तिकीटसाठी ५० रुपयांऐवजी आता केवळ १० रुपये मोजावे लागणार आहे. प्लॅटफॉर्म तिकिटामधील ही कपात गुरुवार २५ नोव्हेंबरपासून लागू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

    Good news for train passengers, reduction in platform tickets; Now you have to pay only 10 rupees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती

    लडाखमध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी; चिनी धोक्याला थेट प्रत्युत्तर!!

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे लखनऊ न्यायालयात सरेंडर, 5 मिनिटांनी जामीन; सैन्यावरील टिप्पणीचा खटला