वृत्तसंस्था
हैदराबाद : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत फक्त मुस्लीम उमेदवार देणार नाही, तर अन्य समाजांना ही संधी देऊ, असे सांगत असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशात 100 जागा लढणार असल्याची घोषणा केली आहे.
सुहेलदेव समाज पार्टीचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी ओवैसी यांची साथ सोडली असली तरी त्यांचा निवडणूक लढविण्याचा निर्धार कायम आहे.gone through with this type of situation earlier took decision of his party left but contest polls are preparing for 100 seats
2022 च्या सुरुवातीलाच उत्तर प्रदेशासह पंजाब गोवा आदी राज्यांच्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या ते आहे एआयएमआयएम पक्षाचे धोरण जाहीर केले.
सुमारे वर्षभरापूर्वी सुहेलदेव पार्टीचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी ओवैसी यांच्यासमवेत आघाडी करून काही सभा घेतल्या होत्या. दोन्ही नेत्यांनी आघाडी करून उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. परंतु पंधरा दिवसांपूर्वी ओमप्रकाश राजभर यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेऊन सुहेलदेव पार्टीची समाजवादी पक्षाशी आघाडी करून टाकली. त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांची साथ सोडून दिली.
तरी देखील ओवैसी यांनी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. सध्या ते शिवपाल यादव आणि अन्य नेत्यांच्या संपर्कात आहेत तसेच त्यांनी भीम आर्मीचे तरुण नेते चंद्रशेखर आजाद यांच्याशी देखील संपर्क साधला आहे. राज्यात समविचारी पक्षांची आघाडी करून सर्व समाजाला प्रतिनिधित्व देणारी उमेदवार यादी जाहीर करू फक्त मुस्लीम उमेदवार नसतील, अशी ग्वाही ओवैसी यांनी दिली आहे.
gone through with this type of situation earlier took decision of his party left but contest polls are preparing for 100 seats
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना कन्नडसक्ती नको , कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत
- कोरोना लसीकरणात मागास जिल्ह्यांमध्ये ‘हर घर दस्तक’ केंद्र सुरू होणार
- शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याकडून केली ७५ कोटींची मागणी , मानसिक छळाचा केला आरोप
- पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत; सोनारपूर नगरपालिका क्षेत्रात आजपासून तीन दिवसांचा लॉकडाऊन