• Download App
    देवाने मला वाचवले! अवैध स्थलांतरितांविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प आक्रमक; अमेरिकेला कर्जमुक्त करण्याचा निर्धार|God saved me! Donald Trump Aggressive Against Illegal Immigrants; Determined to make America debt free

    Donald Trump : देवाने मला वाचवले! अवैध स्थलांतरितांविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प आक्रमक; अमेरिकेला कर्जमुक्त करण्याचा निर्धार

    वृत्तसंस्था

    विस्कॉन्सिन : 13 जुलै रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी प्रथमच भाषण केले. विस्कॉन्सिन राज्यात पार पडलेल्या पक्षाच्या अधिवेशनात ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अवैध स्थलांतरितांवर प्रखर टीका केली. ट्रम्प यांनी त्यांची तुलना एलियनशी केली. ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेत नोकऱ्या कोणाला मिळत आहेत, अमेरिकेतील 107% नोकऱ्या अवैध परदेशी लोकांनी बळकावल्या आहेत.” ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांची तुलना फिल्मी जगतातील राक्षसांशी केली आणि ते तुम्हाला खातील असे म्हटले.God saved me! Donald Trump Aggressive Against Illegal Immigrants; Determined to make America debt free

    ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला तेव्हाही ते अवैध स्थलांतरितांविरोधात बोलत होते. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात हल्ल्याचा अनुभव आपल्या समर्थकांसोबत शेअर केला. ट्रम्प म्हणाले, “मी त्याबद्दल पुन्हा कधीही बोलू शकणार नाही. मी आज तुमच्यामध्ये आहे, कारण त्या दिवशी देव माझ्यासोबत होता.”



    ट्रम्प म्हणाले, “माझे हात रक्ताने माखले होते. पण गोळीबारातही मी शांत राहिलो. माझे समर्थक तेथून पळून गेले नाहीत. ते माझ्या पाठीशी उभे राहिले. सीक्रेट सर्व्हिस टीमनेही उत्तम काम केले.” ट्रम्प यांनी आपल्या भाषणात फक्त एकदाच बायडेन यांचे नाव घेतले. मग म्हणाले, “मी त्यांचा पुन्हा उल्लेख करणार नाही.”

    ‘अमेरिकेचे कर्ज कमी करणार’

    ट्रम्प म्हणाले, “आम्ही आमचे कर्ज कमी करू आणि जनतेवरील कराचा बोजाही कमी करू. अमेरिकेतील सध्याच्या प्रशासनात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती 57 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचवेळी पेट्रोलच्या किमती 60 टक्क्यांनी वाढल्या आहेत. – माझ्या कार्यकाळात देशात महागाई नव्हती.

    ‘मी 2 महिन्यांत आयएसआयएसचा पराभव केला’

    ट्रम्प परराष्ट्र धोरणाबाबत बायडेन प्रशासनावर जोरदार हल्ला चढवत आहेत. ते म्हणाले, “आम्ही अफगाणिस्तानमध्ये 85 अब्ज किंमतीची शस्त्रे सोडली आहेत. जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे.” सीरियामध्ये आयएसआयएसला पराभूत करण्यासाठी 5 वर्षे लागली, परंतु त्यांनी अवघ्या 2 महिन्यांत त्याचा पराभव केला, असा दावा ट्रम्प यांनी केला.

    ‘माझ्या कार्यकाळात रशियाने कोणत्याही देशावर कब्जा केला नाही’

    रशिया-युक्रेन युद्धासाठी डेमोक्रॅटिक पक्षाला जबाबदार धरत ट्रम्प म्हणाले, “राष्ट्राध्यक्ष बुश यांच्या कार्यकाळात रशियाने जॉर्जियावर आक्रमण केले. राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या काळात रशियाने क्रिमियाला जोडले. सध्या रशियाने युक्रेनवर आक्रमण केले.”

    ट्रम्प म्हणाले, “माझ्या कार्यकाळात रशिया काहीही करू शकला नाही. आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या अगदी जवळ आले आहे. हे आतापर्यंतचे सर्वात भयंकर युद्ध असेल. जर मी राष्ट्राध्यक्ष झालो तर आलेले प्रत्येक संकट मी संपवून टाकेन.” ते म्हणाले की, आज मी राष्ट्राध्यक्ष असतो तर रशिया-युक्रेन युद्ध कधीच सुरू झाले नसते. हमास इस्रायलवर हल्ला करू शकत नाही.

    रशियाने क्युबाच्या किनाऱ्यापासून 96 किमी अंतरावर आपली आण्विक पाणबुडी तैनात केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

    God saved me! Donald Trump Aggressive Against Illegal Immigrants; Determined to make America debt free

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Indians : 2024 मध्ये 2 लाख भारतीय नागरिकत्व सोडले; 2020 पेक्षा हे अडीच पट जास्त; केंद्राने लोकसभेत गेल्या 5 वर्षांचा डेटा दिला

    सब के बॉस तो हम है!!, असे मानणाऱ्यांना भारताचा विकास सहन होत नाही; राजनाथ सिंहांचा ट्रम्प तात्यांना टोला!!

    Center Reports : केंद्राने म्हटले- अमेरिकेत 5 मंदिरांची तोडफोड; बांगलादेशात 5 वर्षांत हिंदूंवर 3582 हल्ले, पाकिस्तानात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसेच्या 334 घटना