• Download App
    साक्षीदारांना संरक्षण देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे योगी सरकारला आदेश |Give security to Lakhimpur witneses

    साक्षीदारांना संरक्षण देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे योगी सरकारला आदेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला याप्रकरणातील साक्षीदारांना संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत.या प्रकरणात जे इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत त्याबाबतचे अहवाल तयार करण्यास न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि त्यातील तज्ज्ञांशी बोलावे अशी सूचना खंडपीठाने साळवे यांना केली.Give security to Lakhimpur witneses

    या प्रकरणामध्ये दोन तक्रारी दाखल झाल्या असून त्यातील एक ही पत्रकाराच्या हत्येशी संबंधित आहे. याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी ही ८ नोव्हेंबर रोजी होईल.



    याआधी २० ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या हिंसाचाराच्या तपासामध्ये कोणतीही चालढकल केली जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पोलिसांना तशा सूचना देखील दिल्या होत्या.

    Give security to Lakhimpur witneses

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- केंद्र-राज्यांनी हेट स्पीच थांबवावी; नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे

    Agra Protest : आग्र्यात उद्धव-राज ठाकरे यांचे पुतळे जाळले; हिंदी भाषकांवरील हल्ल्यांविरोधात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

    Changur Baba : छांगूर बाबा हिंदू मुलींना मुस्लिम देशांमध्ये पाठवायचा; पीडितेकडून बलात्काराचा आरोप