• Download App
    अफगाणिस्तानला मदत पाठवण्याचे आता इम्रान, जीनपिंग यांचे थेट जगालाचा साकडे |Give help to Afghanistan say Pakistan an china

    अफगाणिस्तानला मदत पाठवण्याचे आता इम्रान, जीनपिंग यांचे थेट जगालाचा साकडे

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद – अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने मानवतावादी आणि आर्थिक मदत पाठवावी असे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी संयुक्तरित्या केले. या दोन देशांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन प्रथमच असे आवाहन केले.Give help to Afghanistan say Pakistan an china

    अफगाणिस्तानमध्ये हिवाळा तोंडावर आला असताना जीवनावश्यक वस्तूंचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्थितीविषयी इम्रान आणि जिनपिंग यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. याविषयी पंतप्रधान कार्यालयाने निवेदन जारी केले आहे.



    चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी सोमवारी तालिबानच्या प्रतिनिधींशी कतारमध्ये उच्चस्तरीय बैठकीत चर्चा केली. इराणसह शेजारी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह तालिबान सरकार तेहरानमध्ये बैठक घेणार आहे. त्यावेळी चीन आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रीही उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

    Give help to Afghanistan say Pakistan an china

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची