विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एक मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी सुरू होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सरसकट सर्वांना लस मोफत द्यावी, या मागणीचा पुनरुच्चार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला.Give free vaccine to every Indian citizen rahul gandhi
राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, फ्री हे विशेषण आणि क्रियाविशेषण असून इंग्रजी शब्दकोशातील याचा अर्थ कोणत्याही प्रकारे मूल्य न आकारणे किंवा किंमत द्यावी न लागणे असा आहे.
संपूर्ण देशाला आणि प्रत्येक नागरिकाला कोविड प्रतिबंधक लस निःशुल्क मिळायलाच हवी. अपेक्षा करूयात की त्यांना यावेळी मोफत लस मिळेल.दुसरीकडे कोविड-१९ वरील चर्चा बंद करा, ऑक्सिजन टंचाईवरील चर्चा बंद करा,
रेमडेसिव्हीर नाही तरीही चर्चा बंद करा, रुग्णालयात खाटा नाही चर्चा बंद करा. केवळ निवडणुकीवर चर्चा करा, अशा शब्दांत सुरजेवाला यांनी भाजपवर टीका केला. आता ‘साहेबांचे ऐकायचे की मानवतेचे, असे सूचक आवाहनही त्यांनी केले.
Give free vaccine to every Indian citizen rahul gandhi
महत्वाच्या बातम्या
- रुग्णालयामध्ये बेड नसले तरीही उपचार करा, गुजरात सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश
- हनुमानांचे जनमस्थान नाशिक जिल्ह्यातील अंजनेरीच
- महाराष्ट्र, मध्य प्रदेशपेक्षा राजधानी दिल्लीलाच कमी ऑक्सिजन का?, उच्च न्यायालयाने केंद्रा सरकारला फटकारले
- मोदींची हुकूमशहा प्रतिमा निर्माण करण्याचा डाव, परदेशी माध्यमांकडून रिझाईन मोदी हॅशटॅगबाबत चुकीचा प्रचार
- लसीवरून राजकारण, केंद्राने डाटाच जाहीर करून दिले उत्तर, महाराष्ट्रात पाच लाख डोस शिल्लक