• Download App
    दोन डोसमधील अंतराबाबत खुलासा करण्याचे न्याायालयाचे केंद्र सरकारला आदेश|Give explanation about duration of two doses

    दोन डोसमधील अंतराबाबत खुलासा करण्याचे न्याायालयाचे केंद्र सरकारला आदेश

    विशेष प्रतिनिधी

    कोची – कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लशीच्यान दोन डोसमधील ८४ दिवसांचे अंतर हे लशीची उपलब्धता किंवा तिच्या परिणामकारकतेवर आधारित आहे, याचा खुलासा करण्याचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले.Give explanation about duration of two doses

    किटेक्स गारमेंट्स लिमिटेड या कंपनीने कामगारांना कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस देण्यास परवानगी मिळण्याासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर आज सुनावणीदरम्यान न्यायाधीश पी. बी. सुरेश कुमार यांनी दोन डोसमधील अंतर कशाच्या आधारावर निश्चिपत केले आहे, याची माहिती देण्याचे निर्देश केंद्राला दिले.


    ते म्हणाले की, जर दोन डोसच्या अंतरासाठी लशीची परिणामकारकता हे कारण असेल तर हे चिंतेचे कारण आहे. कारण मी पहिला डोस घेतल्यानंतर ४ ते ६ आठवड्यात दुसरा डोस घेतला आहे.लशीची उपलब्धता हे अंतरामागील कारण असेल तर ‘किटेक्स’ सारख्या ज्यांना लस विकत घेणे शक्य आहे,

    त्यांनी सध्याच्या नियमानुसार ८४ दिवसांची प्रतीक्षा न करता लस घेण्यास परवानगी द्यायला हवी. परिणामकारतेमुळे डोसचे अंतर ८४ दिवस केले असले तर त्यासाठी शास्त्रीय आधार देणे आवश्युक आहे.

    Give explanation about duration of two doses

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर

    Siddaramaiah : सरकारी ठिकाणी RSS शाखा, बंदीच्या आदेशाला स्थगिती; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिद्धरामय्या सरकार खंडपीठात आव्हान देणार

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता