• Download App
    कोरोनवरील ३ हजार कोटीच्या खर्चाचा तपशील द्या; श्वेतपत्रिका काढण्याची भाजप नगरसेवकांची मुंबई महापालिकेकडे मागणी|Give details of expenditure of Rs 3,000 crore on corona; BJP corporators demand issue white paper to Mumbai Municipal Corporation

    कोरोनावरील ३ हजार कोटीच्या खर्चाचा तपशील द्या; श्वेतपत्रिका काढण्याची भाजप नगरसेवकांची मुंबई महापालिकेकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाविरोधी लढ्यासाठी मुंबई महापालिकेने २०२० पासून ३ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या सात महिन्यात १२१९.५० कोटी रुपये खर्च केले तर .गेल्या आर्थिक वर्षात १८०९.५० कोटी खर्च केल्याचा दावा केला.दरम्यान, कोणत्या काळात किती खर्च केला, याचा तपशील द्यावा,अशी मागणी भाजप नगरसेवकाने केली असून याबाबतची श्वेतपत्रिका काढावी, असा आग्रह धरला आहे.Give details of expenditure of Rs 3,000 crore on corona; BJP corporators demand issue white paper to Mumbai Municipal Corporation

    कोरोनाचा संसर्ग आणि लाटेच्या काळात स्थायी समितीने अनेकदा काळाची गरज हवा तेवढा निधी खर्च केला. त्यावेळी या निधीला कोणी आक्षेपही घेतला नाही. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आता श्वेत पत्रिका काढून कसा खर्च केला? याचा तपशील दिला.



    कोरोना काळात महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी सीएसआर फंडातून आला होता. त्याचा ही तपशील दिला जावा. ३ हजार कोटी कसे खर्च केले. त्याची सविस्तर माहिती जनतेला उपलब्ध करून द्यावी. कारण जनतेने हा पैसा हा कररूपात संकलित केला होता.

    भाजपचे विनोद मिश्रा म्हणाले, महापालिकेने कोरोना काळात अफाट रक्कम खर्च केली आहे. विशेष म्हणजे रस्त्यासाठी मंजूर झालेला निधीही वळवून खर्च केला आहे.

    Give details of expenditure of Rs 3,000 crore on corona; BJP corporators demand issue white paper to Mumbai Municipal Corporation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!