नितीश कुमार राज्यात कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरत आहेत, असं गृह राज्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये मागील काही दिवसांत अनेक घटना समोर आल्या आहेत. भाजपा नेत्यांवर लाठीचार्ज असो किंवा कटिहारमधील खराब वीज व्यवस्थेचा निषेध करणाऱ्या लोकांवर झालेल्या गोळीबारात मृत्यू असो किंवा बेगुसरायमध्ये मुलीसोबत घडलेले अमानवी कृत्य असो, नितीश सरकाराच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी आता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. Giriraj Singh criticizes Nitish Kumar government in Katihar firing case
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नाही. सत्ताधारी पक्षाचे लोक नुसती मेजवानी करत आहेत. यामुळे एकमेकांना जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळते.
यानंतर गिरीराज सिंह यांनी नितीश कुमारांवर हल्लाबोल करत म्हटले की, नितीश बाबू धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत, सत्तेच्या सिंहासनावर बसले आहेत, ते शिक्षकाला लाठीने बडवतात, कोणी वीज मागितली तर गोळ्या झाडतात, अनुसूचित समाजातील मुलीने तिचा हक्क मागितला तर तिला निर्वस्त्र केले जाते, तिला अपमानित केले जाते. त्यांच्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीने म्हटले आहे की जो कोणी म्हणेल त्याला गोळ्या घालू, कोणीही त्यांचा हक्क मागू नये.
बिहारचे मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरत आहेत, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी म्हटले आहे. त्यांनी बिहार पोलिसांवरही हल्ला चढवत ‘राज्य सरकारच्या आश्रयाखाली बिहार पोलीस गुन्हेगार बनले आहेत’ असे म्हटले आहे. निष्पाप आणि निशस्त्र लोकांवर गोळीबार केला जात आहे. पोलिस आपल्या मर्जीने लोकांना मारण्यासाठी गोळ्या आणि लाठ्या वापरत आहेत.
Giriraj Singh criticizes Nitish Kumar government in Katihar firing case
महत्वाच्या बातम्या
- ईडी संचालक मुदतवाढीसाठी केंद्र पुन्हा सुप्रीम कोर्टात; आज होणार सुनावणी
- “आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांपैकी एक असेल” – पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास!
- निधी वाटपाची कोंडी; शिंदे – फडणवीस, भाजप श्रेष्ठींचे नियंत्रण आणि काँग्रेसचा दबाव यात अजितदादांची खरी कसोटी!!
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ‘भारत मंडपम’चे उद्घाटन, जाणून घ्या वैशिष्ट्ये