• Download App
    राहुल गांधींच्या अपात्रतेप्रकरणी नितीश कुमारांच्या मौनावर गिरीराज सिंह यांचा टोला, म्हणाले…Giriraj Singh comment on Nitish Kumar calm attitude regarding Rahul Gandhi disqualification

    राहुल गांधींच्या अपात्रतेप्रकरणी नितीश कुमारांच्या मौनावर गिरीराज सिंह यांचा टोला, म्हणाले…

    राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचाही घेतला आहे समाचार

    विशेष प्रतिनिधी

     पाटणा­ – बिहारमधील बेगुसराय येथील खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी रविवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राहुल गांधींच्या अपात्रतेप्रकरणी मौन बाळगल्याबद्दल टोला लगावला आहे. गिरीराज सिंह म्हणाले, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राहुल गांधींच्या अपात्रतेवर बाळगलेले “मौन” दर्शवते की जेडी(यू) नेते विरोधी गटाच्या नेतृत्वावर दावा करण्याच्या वाढत्या शक्यतांबद्दल आनंदी आहेत. Giriraj Singh comment on Nitish Kumar calm attitude regarding Rahul Gandhi disqualification

    याशिवाय गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्या ‘माझे नाव सावरकर नाही’ या वक्तव्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की,  सावरकर समजण्यासाठी  राहुल गांधींना अनेक जन्म घ्यावे लागतील.

    VIDEO : तसंही कुणीतरी म्हटलेलंच आहे, “ हर गांधी महात्मा नही होता” तेच खरं – भाजपाने लगावला टोला!

    काँग्रेसचे केरळच्या वायनाडमधील खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल अपमानास्पद टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच,  राहुल गांधींना गुजरातच्या सुरत कोर्टात मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर कायद्यानुसार त्यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे.  याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे नेते, कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली जात आहे.

    Giriraj Singh comment on Nitish Kumar calm attitude regarding Rahul Gandhi disqualification

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 21 लोकांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी; 5 किमीपर्यंत ऐकू आला स्फोटाचा आवाज

    Rule Change Today: एलपीजी सिलिडर महागले… एटीएफच्या किमती वाढल्या, आजपासून देशभरात 5 मोठे बदल

    India GDP : तिसऱ्या तिमाहीत GDP वाढ 7.8% राहिली; 50% ट्रम्प टॅरिफ असूनही अर्थव्यवस्था मजबूत