रात्री डॉक्टरांना मारहाण करण्यासाठी गुंडांना कोणी पाठवले? असा सवालही केली आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. ज्युनियर डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टरही देशभरात रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे फायर ब्रँड नेते गिरिराज सिंह ( Giriraj Singh ) यांनी बंगालमधील घटनेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.
शुक्रवारी आयएएनएसशी खास बोलतांना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात म्हटले की, सत्तेच्या मागे लागलेल्या ममता बॅनर्जी आज ‘मां, माटी आणि मानुष’ विसरल्या आहेत. कोलकातामधील घटेनेने दिल्लीच्या निर्भया घटनेची आठवण करून दिली आणि आज ममता बॅनर्जी उडवाउडीवची विधानं करत आहेत आणि प्रभू रामाला शिव्या देत आहेत. रात्री डॉक्टरांना मारहाण करण्यासाठी गुंडांना कोणी पाठवले? बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जीशिवाय एक पानही हलत नाही, त्यांच्या आदेशाशिवाय तेथील लोक श्वासही घेत नाहीत.
परिस्थिती अशी आहे की हजारो गुंड पोलिसांच्या नकळत तिथे पोहोचले आहेत, त्यांना कोणाला मूर्ख बनवायचे आहे? शांती मोर्चा काढते, मगरीचे अश्रू ढाळते, मी म्हणतो की त्यांना गुंडांना पकडायचे होते, तर कोण म्हणतो 12 तास, त्यांनी त्याला 1 तासात पकडले असते. पण, पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी गुंड पाठवले, त्यांच्याकडूनच तोडफोड होत आहे आणि, आता ते शांतता मोर्चा काढत आहेत.
Giriraj Singh criticized Mamata Banerjee
महत्वाच्या बातम्या
- Ajit pawar : पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट; शिरणार का पुन्हा काकांच्या पुठ्ठ्यात??; की ते सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात??
- Chief Justice Chandrachud : बांगलादेशातील संकटावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- IMA strike : 17 ऑगस्ट रोजी देशभरात IMAचा संप ; म्हणाले ”रुग्णालयांना ‘सेफ झोन’ घोषित करा”
- प्रशांत किशोर यांनी जेडीयू आणि आरजेडीवर साधला निशाणा!