विशेष प्रतिनिधी
जम्मू :कॉँग्रेसमध्ये जी-२३ नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटातील प्रमुख नेते गुलाम नबी आझाद यांनी जम्मूमध्ये कॉँग्रेसला चांगलाच झटका दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्येकाँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या सात नेत्यांनी एकाच वेळी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.Ghulam Nabi Azad’s blow to Congress in Jammu and Kashmir, seven leaders resign at once
गुलाम नबी आझाद यांच्या निकटच्या मानल्या जाणाऱ्या या नेत्यांमध्ये जीएम सरोरी, जुगल किशोर शर्मा, विकार रसूल, नरेश कुमार गुप्ता, अन्वर भट यांचा समावेश आहे. सोनिया गांधींशिवाय या नेत्यांनी माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रदेश प्रभारी रजनी पाटील यांनाही राजीनाम्याच्या प्रती पाठवल्या आहेत.
हे सर्व नेते गुलाम नबी आझाद गटाचे असून पक्षनेतृत्व बदलाच्या निर्णयामुळे नाराज असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर पक्षाशी संबंधित मुद्द्यांवर त्यांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
राजीनामे पाठवणाºयांमध्ये चार माजी मंत्री आणि तीन आमदारांचा समावेश आहे. या काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्याच्या काही दिवसांपूर्वी आझाद जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या नेत्यांनी प्रदेश काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधी वृत्तीमुळे हे पाऊल उचलले असल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्यावर निशाणा साधला आहे. माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह आझाद यांच्या जवळच्या काही नेत्यांनी राजीनामा दिलेल्या नेत्यांपासून दुरावल्याचेही सूत्रांनी सांगितले. या नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्यात म्हटले की, त्यांनी त्यांच्या प्रश्नांकडे पक्षप्रमुखांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना वेळ देण्यात आला नाही.
गेल्या वर्षभरापासून पक्षनेतृत्वाकडे भेटीची वेळ मागितली होती, मात्र त्यांना वेळ देण्यात आला नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.मीर यांची खिल्ली उडवत ते म्हणाले की, मीर यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष अत्यंत दयनीय स्थितीकडे वाटचाल करत आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी राजीनामा देऊन इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे, परंतु काहींनी मौन बाळगण्याचा निर्णय घेतलाय. जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसच्या कारभारावर काही नेत्यांनी कब्जा केला आहे.
Ghulam Nabi Azad’s blow to Congress in Jammu and Kashmir, seven leaders resign at once
महत्त्वाच्या बातम्या
- पवार निघाले ममतांच्या पाठोपाठ; दिल्लीत जाऊन काँग्रेस फोडली!!; जी – 23 मधला नेता लावला राष्ट्रवादीच्या गळाला!!
- पूर्वांचल एक्स्प्रेसवर दिसली देशाची एअर पॉवर, पंतप्रधान मोदींची हर्क्युलस विमानातून एक्स्प्रेसवर एंट्री
- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन व्यापारी आणि दोन दहशतवाद्यांना टिपले
- दहशतवादाचा चिथावणीखोर झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च’वरील बंदी पुन्हा वाढविली