वृत्तसंस्था
कोल्हापूर : भारतातील वेगाने वाढणाऱ्या आणि ग्राहकोपयोगी वस्तूच्या विक्रीत ( एफएमसीजी) घोडावत कंझ्युमरने (जीसीपीएल) आघाडी घेतली असून कंपनी आता मार्च २०२१ अखेरच्या आर्थिक वर्षात एक हजार कोटीचा महसूल प्राप्त करणारी कंपनी बनली आहे.Ghodavat Consumer Becomes a 1000 Crore Brand In seven years; Will expand across the country
संजय घोडावत ग्रुपचा (एसजीजी) एक भाग असलेल्या या कंपनीने नुकताच एक महत्त्वाचा टप्पा गाठला. दररोज वापरण्यायोग्य उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीची यश आणि व्यापक लोकप्रियता यावर मार्गक्रमण करणारी ही एक कंपनी ठरली आहे.कंपनीने मार्च २०२१ अखेरच्या आर्थिक वर्षात एक हजार कोटीचा महसूल प्राप्त केला आहे.
२०१४मध्ये स्वस्त दरात उच्च दर्जाचे उपभोग्य वस्तू ग्राहकांना मिळाव्यात, यासाठी कंपनी लॉन्च केली होती. जीसीपीएलचे अध्यक्ष संजय डी. घोडावत आणि एमडी श्रीनिक घोडावत यांच्या नेतृत्वात आणि
मार्गदर्शनाखाली अतिशय थोड्या काळामध्ये कंपनीने प्रगती केली आहे. देशाच्या पश्चिम आमी दक्षिण भागात सध्या कार्यरत आहे. तिचा विस्तार देशभर करण्याचा मानस आहे.
Ghodavat Consumer Becomes a 1000 Crore Brand In seven years; Will expand across the country
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनाही कोरोनाची लागण, होम आयोसेलेशनमधून पाहणार दिल्लीचा कारभार
- रेमडेसिव्हिरची कमतरता भासणार नाही, इतर देशांतून आयात सुरू; 75000 व्हायल्सची पहिली खेप आज भारतात पोहोचणार
- केंद्र सरकारकडून 258.74 लाख मेट्रिक गव्हाची एमएसपीवर 51 हजार कोटी रुपयांत खरेदी
- प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कोरोनाची झाली होती लागण
- देशाचे माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन; राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सुप्रीम कोर्टानेही व्यक्त केला शोक