आत्मनिर्भर भारत घडविण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. देशातील प्रत्येक जण याकरिता प्रयत्न करीत आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय वायुसेना महत्वपूर्ण योगदान देत आहे असे कौतुक चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी सोमवारी व्यक्त केले.General Bipin Rawat lauded the Air Force’s remarkable contribution in building a self-reliant India
विशेष प्रतिनिधी
नागपूर : आत्मनिर्भर भारत घडविण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. देशातील प्रत्येक जण याकरिता प्रयत्न करीत आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय वायुसेना महत्वपूर्ण योगदान देत आहे असे कौतुक चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी सोमवारी व्यक्त केले.
रावत यांनी सोमवारी भारतीय वायुसेनेच्या नागपुरातील मेन्टेनन्स कमांडला भेट दिली. ते म्हणाले, मेन्टेनन्स कमांड हा भारतीय वायुसेनेचा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. वायुसेनेच्या अमूल्य संपत्तीची देखभाल करण्याची महत्त्वाची जबाबदारी या विभागावर आहे. हा विभाग वेगात आत्मनिर्भर होत आहे.
आत्मनिर्भर भारत, आता एके ४७ चे आधुनिकीकरण करणार भारतीय कंपनी
आपण आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्यामुळे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. मेन्टेनन्स कमांडची आत्मनिर्भरता विदेशी सेवांवरील अवलंबित्व कमी करेल. त्यातून देशाची प्रगती होईल. याशिवाय जीवनमान उंचावण्यासाठी आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठीही मेन्टेनन्स कमांडद्वारे प्रशंसनीय प्रयत्न केले जात आहेत.
General Bipin Rawat lauded the Air Force’s remarkable contribution in building a self-reliant India
महत्त्वाच्या बातम्या
- Amravati Violence : दंगलीच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करणारे भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक, शिवसेना नेत्यावर मात्र कारवाई नाही!
- त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? – आशिष शेलार
- चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित
- ३४५ इच्छूकांनी दिल्या मुलाखती , मनपा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीची औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
- आठवणी बाबासाहेबांच्या : सावरकर म्हणाले होते, नाशच करायचा असेल तर काबूल पलिकडे जाऊन अब्दालीच्या घराण्याचा करा ना…!!