• Download App
    कोरोनाने सरलेल्या वर्षात लावली अर्थव्यवस्थेची पुरती वाट; पण चौथ्या तिमाहीत जीडीपीचा चांगलाच दिलासा!।GDP grows in Q4, but shrinks in FY 21 due to corona

    कोरोनाने सरलेल्या वर्षात लावली अर्थव्यवस्थेची पुरती वाट; पण चौथ्या तिमाहीत जीडीपीचा चांगलाच दिलासा!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : वाढत्या कोरानामुळे गेल्या आर्थिक वर्षात जीडीपीत ७.३ टक्क्यांनी घट झाली. करोनाचा फटका जगभरातील अर्थव्यवस्थेप्रमाणेच देशातील अर्थव्यवस्थेला बसला आहे. देशाच्या इतिहासात जीडीपीत इतकी घसरण कधीच झालली नव्हती. कोरोनामुळे या अभूतपूर्व स्थीतीला तोंड द्यावे लागणार आहे. GDP grows in Q4, but shrinks in FY 21 due to corona

    भारताचे सकल उत्पन्न मार्च २०२० अखेरच्या १४५ लाख कोटी होते. ते २०२०-२१ मध्ये १३५ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी झाले आहे. हा टप्पा पुन्हा गाठण्यासाठी चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था १०-११ टक्क्यांनी वाढायला हवी. परंतु, कोरोना महासाथीची दुसरी लाट तीव्रतेने पुढे आल्याने यंदाच्या वर्षीही देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.



    गेल्या वर्षाच्या कडक लॉकडाउनमुळे देशातील उद्योग-धंदे ठप्प झाले होते. त्याचा आर्थिक उलाढालीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गेल्या आर्थिक वर्षात कोरोना महासाथीचा उद्रेक होण्यापूर्वीदेखील अर्थव्यवस्थेत मंदीसदृश वातावरण होते. या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी घटली. भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या चार दशकात झालेली ही पहिलीच पूर्ण वार्षिक घसरण आहे.

    GDP grows in Q4, but shrinks in FY 21 due to corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!