प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान दौऱ्या सध्या जी 7 शिखर परिषदेनिमित्त जपान दौऱ्यावर आहेत. यानंतर ते पापुआ न्यू गिनी येथील परिषदेसाठी रवाना होतील. परदेश दौऱ्यावर असताना असे अनेक प्रसंग आहेत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कृतीतून जगाला गांधी विचारांचे दर्शन दिले.Gandhi’s thoughts were awakened by the Prime Minister through foreign visits, Mahatma Gandhi’s message of peace and non-violence was given in action from Brisbane to Hiroshima.
शांतता आणि सौहार्दाचे आदर्श महात्मा गांधी यांचे विचार या अस्थिर जगासाठी किती महत्त्वाचे आहेत हे पंतप्रधान मोदींनी आपल्या परदेश भेटींतून वेळोवेळी दाखवून दिले आहे. हिरोशिमामध्ये नुकतेच त्यांनी पीस मेमोरिअल पार्कला भेट दिली. येथे त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून गांधी विचारांचे महत्त्व पटवून दिले. 1945 मध्ये याच शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता.
पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर गांधी विचारांचा प्रसार करण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी 2014 मध्ये जेव्हा ते वॉशिंग्टनच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते, तेव्हाही गांधीजींना आदरांजली वाहिली होती. या कृतीतून त्यांनी गांधीजींच्या तत्त्वांबद्दलचा आदर दाखवून दिला.
त्याच वर्षी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन भेटीदरम्यान पीएम मोदींनी गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण केले. महात्मा गांधी हे जागतिक स्तरावर असंख्य लोकांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ असल्याचे यातून दिसले.
2015 मध्ये पीएम मोदींनी तुर्कमेनिस्तानात आणि किर्गिझस्तानातही गांधीजींच्या प्रतिमेचे अनावरण केले. शांतता, सर्वसमावेशकता आणि न्यायाच्या सामायिक वचनबद्धतेची आठवण यातून त्यांनी करून दिली.
2015 मध्येच जर्मनीच्या हॅनोव्हर येथेही पीएम मोदींनी गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण केले. याशिवाय त्याच वर्षी मॉरिशस भेटीदरम्यानही त्यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली होती.
Gandhi’s thoughts were awakened by the Prime Minister through foreign visits, Mahatma Gandhi’s message of peace and non-violence was given in action from Brisbane to Hiroshima.
महत्वाच्या बातम्या
- पुणे महानगरपालिकेचं पुरोगामी पाऊल; तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतलं जाणार
- बिग बॉस मध्ये गेल्यावर भल्याभल्यांची इमेज खराब होते माझी मात्र सुधारली.. तृप्ती देसाई..
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सावरकर जयंतीचा आठवडाभर प्रचंड धुमधडाका!!
- भाजपा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ओडिशातील एक कोटी कुटुंबांशी साधणार संपर्क