विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपने गेल्या सहा महिन्यात चार मुख्यमंत्री बदलले त्यावरून वरिष्ठ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राजस्थानातल्या एका कार्यक्रमात टोलेबाजी केल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. गडकरींचे भाषण तसेच होते.Gadkari’s gangsterism in the media over the BJP’s change of four chief ministers, but what about the unrest against the chief ministers in the Congress?
परंतु मुख्यमंत्री बदलण्याच्या फक्त भाजपच्याच प्रवृत्तीवर नव्हे, तर काँग्रेसच्या प्रवृत्तीवरही त्यांनी कोरडे ओढल्याचे स्पष्ट होते आहे. परंतु याविषयी माध्यमांनी “सिलेक्टीव्ह रिपोर्टिग” केले.कारण भाजपमध्ये कोणतीही बंडखोरी अथवा न होता चार राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्यात आले. भाजप अंतर्गत प्रक्रियेचा तो भाग असल्याचे सांगण्यात आले.
पण काँग्रेसमध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात काँग्रेसच्याच वरिष्ठ नेत्यांनी जे बंड केले त्यावरही टिप्पणी नव्हती का? छत्तीसगडमध्ये वरिष्ठ मंत्री टी. एस. सिंहदेव आणि राजस्थानात सचिन पायलट यांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांविरुद्ध चे बंङ केले त्याविरुद्ध देखील गडकरींचे भाष्य होते. हे स्वीकारले पाहिजे.
पण माध्यमांनी तसे लिहिले नाही.मुख्यमंत्र्यांविरुद्ध असंतोष हे सर्वच पक्षांमध्ये थोड्याफार प्रमाणात असतात. अशावेळी गडकरी यांच्या भाषणाचा अन्वयार्थ फक्त भाजपनेच मुख्यमंत्री बदलले असा माध्यमांनी केला.
प्रत्यक्षात त्यांनी मुख्यमंत्री बदलण्याच्या सर्वपक्षीय प्रवृत्तीवर आपले भाष्य केल्याचे दिसले. हे मात्र माध्यमांनी प्रसिद्ध केले नाही फक्त भाजपने मुख्यमंत्री बदल्याच्या बाजूवर गडकरींनी टीकाटिपणी केल्याचे “सिलेक्टिव्ह रिपोर्टिंग” माध्यमांनी करून घेतले.
Gadkari’s gangsterism in the media over the BJP’s change of four chief ministers, but what about the unrest against the chief ministers in the Congress?