विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात दुसऱ्यांदा सत्तारूढ झालेले मोदी सरकार बहुमतातले आहे, की अल्पमतातले आहे, वगैरे चर्चा काँग्रेस सह बाकीच्या विरोधी पक्षांनी सुरू ठेवली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय असाइनमेंटचा धडाका लावला आहे.G7 Summit: PM Modi attends Outreach Session, meets Pope Francis
पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्याच परदेश दौऱ्यात मोदींनी इटलीमध्ये प्रगत राष्ट्रांचा समूह (G7) च्या राष्ट्र प्रमुखांशी चर्चा केली. त्यामध्ये मोदींनी ब्रिटन बरोबर मुक्त व्यापारावर, तर फ्रान्स बरोबर “मेक इन इंडिया” संकल्पनेवर भर देणारी चर्चा केली. ब्रिटन बरोबर मुक्त व्यापार हा विषय 1991 पासून दोन्ही देशांच्या अजेंड्यावर आहे. त्यामध्ये अनेक राजनैतिक आणि व्यापारी अडथळे आहेत. परंतु टप्प्याटप्प्याने अडथळे दूर करून दोन्ही देश एका विशिष्ट मतैक्यापर्यंत येऊन ठेपले आहेत. मोदींच्या तिसऱ्या कारकीर्दीत दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार होण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी चर्चा केली.
फ्रान्सचे अध्यक्ष इम्युएल मॅक्रोन यांच्या समवेत पंतप्रधान मोदींनी भारत फ्रान्स यांच्यातल्या संरक्षण सहकार्य वाढविण्याच्या विषयावर चर्चा केली. भारताने आधीच फ्रान्स समवेत 36 राफेल विमाने खरेदीचा करार केलाच आहे. त्यापैकी 10 विमाने भारतातील दाखल झाली आहेत. उरलेली 26 विमाने लवकरच दाखल होणार आहेत. फ्रान्स हा युरोप मधल्या सर्व देशांमध्ये भारताचा सर्वाधिक मोठा संरक्षण क्षेत्रातल्या पार्टनर आहे. दोन्ही देशांमधला संरक्षण विषयक करार युरोपमधल्या इतर कुठल्याही देशापेक्षा मोठा आहे.
मोदी आणि मॅक्रोन यांनी 2047 पर्यंत भारत – फ्रान्स दरम्यान संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला असून त्यामध्ये “मेक इन इंडिया” ही संकल्पना केंद्रीभूत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यामध्ये फ्रान्स काही विशिष्ट संरक्षण सामग्री भारतातील कारखान्यांमध्ये तयार करून ते इतरत्र निर्यात करण्याची योजना आखत आहे. याचे भारताला तंत्रज्ञान विषयक तसेच रोजगार विषयक लाभ होणार आहेत.
G7 Summit: PM Modi attends Outreach Session, meets Pope Francis
महत्वाच्या बातम्या
- बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चिनी नागरिकावर EDची कारवाई, १३ कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त!
- NEET वादात कोचिंग सेंटर्सनी ओतले तेल! कमी अभ्यासक्रम आणि सोप्या परीक्षेमुळे त्यांच्या नफ्यावर होतो थेट परिणाम
- PM मोदी इटली दौऱ्यावर रवाना, G7 शिखर परिषदेत सहभागी होणार!
- लोकसभा निवडणूक संपताच भाजपा विधानसभेसाठी झाली सक्रिय