• Download App
    मदतीचे हात पुढे करूनही तालीबान्यांचे शेपुट वाकडेच, भारताला चिथावण्यासाठी सैन्याच्या तुकडीचे नाव ठेवले पानिपत|Fwd: Despite extending a helping hand, the Taliban's are against India

    मदतीचे हात पुढे करूनही तालीबान्यांचे शेपुट वाकडेच, भारताला चिथावण्यासाठी सैन्याच्या तुकडीचे नाव ठेवले पानिपत

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या अफगणिस्थानला भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र, तालीबान्यांचे शेपुट वाकडेच आहे. तालिबानने त्यांच्या एका सैन्यतुकडीचे नाव पानिपत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला चिथावण्याचा यामागे हेतू आहे.Fwd: Despite extending a helping hand, the Taliban’s are against India

    पानिपत हा हरियाणातील एक जिल्हा असून पानिपतच्या तिसºया लढाईत अफगाणिस्तानचा सत्ताधीश अहमद शाह अब्दालीने मराठय़ांचा पराभव केला होता. अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतात पाकिस्तानच्या सीमेवर तालिबानची पानिपत सैन्यतुकडी तैनात करण्यात येणार आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या सत्तेत असणाºया तालिबानच्या हंगामी सरकारने स्थानप केलेल्या विशेष लष्करी पथकाला पानिपत असे नाव दिले आहे.



    अहमद शाह दुरार्णीच्या नेतृत्वाखाली १७६१ साली झालेल्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव केलेल्या अफगाणी फौजांकडून प्रेरणा घेण्याच्या हेतूने हे नाव ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
    सोशल मीडियावरुनही तालिबानने केलेल्या या नामकरणावरुन चांगलीच टीकेची झोड उठवण्यात आलीय.

    मागील वर्षी अमेरिकेने अफागाणिस्तानमधील लष्कर मागे घेतल्यानंतर तालिबानने या देशावर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी अशाप्रकारे भारताशी संबंधित निर्णय घेत थेट भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.पानिपतच्या लढाईचा संदर्भ अनेकदा अफगाणिस्तानमधील ग्रामीण भागांमध्ये दिला जातो.

    येथील मुस्लिमांच्या भावना भडकवण्यासाठी आणि त्यांना शस्त्र हाती घेण्यासाठी प्रेरित करायला पानिपतच्या युद्धामधील गोष्टी सांगितल्या जातात. या ठिकाणी काश्मीर, पॅलेस्टाइनसारख्या गोष्टींवर मशिदी आणि प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी पाकिस्तानबरोबरच अफगाणिस्तानमध्येही चर्चेत असतात.

    सोशल मीडियावरुन या नामकरणाला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत असला तरी काहींनी यावरुन तालिबान्यांचं कौतुकही केलंय. अफगाणिस्तानमधील जावीद तन्वीर या युझरने भूतकाळात जे घडलंय तेच पुन्हा घडेल असं म्हटलंय. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील अन्य एकाने हे फारच मजेशीर आणि माज दाखवणारं आहे. हा आदेश पाकिस्तानकडून आल्यासारखं वाटतंय. पाकिस्तानला भारताविरुद्ध खुसपटं काढायची असल्याने त्यांच्या सांगण्यावरुन हे करण्यात आल्याची टीका काहींनी केलीय.

    आधी अफगाणिस्तानी नागरिकांना चांगलं जीवनमान देण्यासाठी प्रयत्न करा, असा फाजील देशाभिमान दाखवणं हे तालिबान्यांसाठी काही नवीन नाही, असल्या गोष्टींना भारतीय परराष्ट्र मंत्रालय भीक घालणार नाही, तुमच्या या हस्यास्पद गोष्टींना भारताकडून साधा प्रतिसादही मिळणार नाही, अशा प्रतिक्रिया भारतीयांनी दिल्यात.

    Fwd: Despite extending a helping hand, the Taliban’s are against India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य