• Download App
    देशातील चार नवीन विमानतळापैकी दोन महाराष्ट्रात : ज्योतिरादित्य सिंधिया; महाराष्ट्रात गोंदिया आणि सिंधदुर्गमध्ये साकारणार |four new airports will be in the country, Two are in in Gondia and Sindhdurg of Maharashtra: Jyotiraditya Sindhiya

    देशातील चार नवीन विमानतळापैकी दोन महाराष्ट्रात : ज्योतिरादित्य सिंधिया; महाराष्ट्रात गोंदिया आणि सिंधदुर्गमध्ये साकारणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात चार नवीन विमानतळांची पायाभरणी करण्याची केंद्र तयारी करत आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील गोंदिया आणि सिंधुदुर्गचा समावेश आहे. चार पैकी पहिले विमानतळ उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये २५५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत आहे.four new airports will be in the country, Two are in in Gondia and Sindhdurg of Maharashtra: Jyotiraditya Sindhiya

    नागरी विमान उड्डाण मंत्री संधिया यांनी ही विमानतळे १०० दिवसांत उभरण्याचा संकल्प केला आहे. त्यात विमानतळाबरोबर हेलीपोर्टचा समावेश आहे. त्यात १६ क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात ८ पायाभूत सुविधा असून ४ सुधारणा करणे आहे.१०० दिवसांत आम्ही ३ मुख्य उद्दिष्टे ठेवली आहेत. त्यात पहिली पायाभूत सुविधा, दुसरी धोरणात्मक उद्दिष्टे आणि तिसरी लक्ष्य सुधारणाचा समावेश आहे.



    सिंधिया म्हणाले, पहिले विमानतळ २५५ कोटी रुपये खर्चाचे असून ते उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे असेल. येथे एअरबस ३२१ आणि बोईंग ७३७ विमाने यशस्वीपणे उतरू शकतील. कुशीनगर बौद्ध सर्किटचा केंद्रबिंदू बनेल. उत्तराखंडच्या डेहराडून विमानतळावर ४५७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे

    या ठिकाणी नवीन टर्मिनल इमारत बांधली जाईल. या गुंतवणुकीमुळे, टर्मिनल बिल्डिंगचा वापर २५० ऐवजी १८०० प्रवासी करू शकतील. त्रिपुरातील अगरतळा विमानतळासाठी ४९० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

    सध्या, ताशी ५०० जण प्रवास करतात. या गुंतवणुकीनंतर ही क्षमता १२०० प्रवासी प्रति तास वाढेल. जेवर विमानतळ हा एकूण ३० हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असेल. चौथ्या टप्प्यापर्यंत जेवर विमानतळाची क्षमता ७ कोटी होणार आहे. ‘

    उड़ान योजनेत १०० दिवसात ५ नवीन विमानतळे

    सिंधिया म्हणाले, ‘उडान योजनेअंतर्गत १०० दिवसांत ५ नवीन विमानतळांचे उद्दिष्ट आहे. गुजरातमधील केशोद, झारखंडमधील देवघर, महाराष्ट्रातील गोंदिया आणि सिंधुदुर्ग आणि उत्तर प्रदेशातील कुशीनगरचा समावेश आहे. हिमाचल प्रदेशमध्ये चार आणि उत्तराखंडमध्ये दोन हेलिपॅड बांधले जातील.

    उडन योजनेमध्ये, आम्ही पुढील १०० दिवसांत ५० नवीन मार्ग सुरू करणार आहोत, त्यापैकी आम्ही ऑक्टोबरमध्येच ३० नवीन मार्ग सुरू करू. केपटाऊन कन्व्हेन्शन विधेयकावर आम्ही पुढील १०० दिवसात मसुदा तयार करण्याचा प्रयत्न करू. आमचा प्रयत्न सर्व भागधारकांशी सल्लामसलत करण्याचा आहे

    four new airports will be in the country, Two are in in Gondia and Sindhdurg of Maharashtra: Jyotiraditya Sindhiya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य