विशेष प्रतिनिधी
कोलकता – तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांना रविवारी १० कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमततेतील सहभागाच्या आरोपावरून अटक करण्यात आली. मुखर्जी यांनी पश्चिम बंगालमधील काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.Former TMC minister arrested in west Bengal
दरम्यान, मुखर्जी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी ते पक्षात सक्रिय नव्हते, असा दावा भाजप नेते सुजित अगस्थी यांनी केला. त्यांच्यावरील आरोप ते तृणमूलमध्ये होते तेव्हाचे आहेत. सरकार आता जागे झाले, का असा सवालही त्यांनी केला.
मुखर्जी पश्चिम बंगालमधील बिष्णूपूरचे माजी आमदारही आहेत. २०२० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष असताना ई-टेंडर व इतर प्रकरणातील आर्थिक अनियमततेच्या आरोपावरून त्यांना पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी नऊ कोटी ९१ लाख रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. बिष्णूपूर पोलिस ठाण्याने याबाबत तपास केला होता.तपासादरम्यान मुखर्जी पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे, त्यांना अटक केली, अशी माहिती बंकुराचे पोलिस अधीक्षक धृतिमान सरकार यांनी दिली.
Former TMC minister arrested in west Bengal
महत्त्वाच्या बातम्या
- नासा चंद्रावरील मातीपासूनच बनविणार बांधकाम साहित्य, पृथ्वीवरून कच्चा माले नेण्याचा अफाट खर्च वाचणार
- लालू पुत्रांमधील संघर्ष शिगेला, दोन्ही भावातील बेबनावामुळे पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता
- देशात जातीनिहाय जनगणना एकदा तरी व्हायलाच हवी, मुख्यमंत्री नितीशकुमार धरणार मोदींकडे आग्रह
- अफगाणिस्तानात सरकार स्थापनेसाठी तालिबान्यांच्या हालचाली सुरू, बरादरचा सरकार स्थापनेसाठी पुढाकार
- ‘अफगाणिस्तानमधील स्थलांतर मोहीम ही इतिहासातील सर्वांत अवघड मोहिम – बायडेन