• Download App
    कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा, नवा पक्ष काढणार, पंजाबमधील सर्व 117 जागांवर निवडणूक लढवणार । Former Punjab CM captain amarinder to announce new Pol Party today in a Press Conference

    कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा, नवा पक्ष काढणार, पंजाबमधील सर्व 117 जागांवर निवडणूक लढवणार

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी चंदिगडमध्ये नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘मी पक्ष स्थापन करत आहे. आता प्रश्न असा आहे की पक्षाचे नाव काय आहे, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण मलाच ते माहिती नाही. जेव्हा निवडणूक आयोग पक्षाचे नाव आणि चिन्ह मंजूर करेल, तेव्हा मी तुम्हाला कळवीन.” Former Punjab CM captain amarinder to announce new Pol Party today in a Press Conference


    वृत्तसंस्था

    चंदिगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी चंदिगडमध्ये नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘मी पक्ष स्थापन करत आहे. आता प्रश्न असा आहे की पक्षाचे नाव काय आहे, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण मलाच ते माहिती नाही. जेव्हा निवडणूक आयोग पक्षाचे नाव आणि चिन्ह मंजूर करेल, तेव्हा मी तुम्हाला कळवीन.”

    कॅप्टन मागच्याआठवड्यात म्हणाले होते की, ते लवकरच नवीन पक्षाची घोषणा करणार आहेत. आणि तीन कृषी कायद्यांवरून शेतकरी हितांचे काही समाधान निघाले तर 2022च्या निवडणुकीत भाजपशी जागांबाबत चर्चा करण्यासही तयार होतील.

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले, “होय, मी नवा पक्ष काढणार आहे. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर चिन्हासह नाव जाहीर केले जाईल. माझे वकील त्यावर काम करत आहेत.” ते म्हणाले की, नवज्योतसिंग सिद्धू जेथून लढतील तिथे आम्ही त्या जागेवरून लढू. कॅप्टन अमरिंदर सिंग पुढे म्हणाले, “आम्ही पंजाबमधील सर्व 117 जागा लढवू, मग लढा युतीत असो किंवा स्वबळावर.”



    चंदीगड येथे पत्रकार परिषदेत कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, मी तिथे असताना या 4.5 वर्षांत आम्ही काय मिळवले याची सर्व कागदपत्रे येथे दिली आहेत. कागद दाखवत ते म्हणाले, “मी जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा हा आमचा जाहीरनामा आहे. हा आमचा जाहीरनामा आहे जे आम्ही साध्य केले आहे.” ते म्हणाले की, मी ९.५ वर्षे पंजाबचा गृहमंत्री होतो. 1 महिना गृहमंत्री राहिलेला कोणीतरी माझ्यापेक्षा जास्त जाणतो. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, “कोणालाही अशांत पंजाब नको आहे. पंजाबमध्ये आपण अत्यंत कठीण टप्प्यातून गेलो आहोत हे आपण समजून घेतले पाहिजे.”

    कॅप्टन म्हणाले की, सुरक्षा उपायांबाबत ते माझी चेष्टा करतात. माझी बेसिक ट्रेनिंग ही एका सैनिकाची आहे. मी 10 वर्षे सेवेत होतो, त्यामुळे मला मूलभूत गोष्टी माहिती आहेत. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांबाबत कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, उद्या आम्ही आमच्यासोबत सुमारे 25-30 लोकांना घेऊन जात आहोत आणि या मुद्द्यावर आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेणार आहोत.

    Former Punjab CM captain amarinder to announce new Pol Party today in a Press Conference

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : RSS च्या कौतुकावरून दिग्विजय सिंह यांना राहुल गांधींनी फटकार, म्हणाले- तुम्ही चुकीचे केले

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- राहुल थकू नका, तुम्हाला तामिळनाडू-बंगालमध्येही हरायचे आहे, त्यांना विकासाचे राजकारण समजत नाही

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा