• Download App
    कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा करणार शक्तीप्रदर्शन, राज्याचा दौरा करून ताकद दाखवून देणार!|Former Karnataka Chief Minister Yeddyurappa will demonstrate his strength by touring the state!

    कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा करणार शक्तीप्रदर्शन, राज्याचा दौरा करून ताकद दाखवून देणार!

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर आता बी. एस. येडीयुरप्पा शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. राज्याचा दौरा करून ते आपली ताकद दाखवून देणार आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्बई यांच्या नेतृत्वाखालील सरकारला येडीयुरप्पा आव्हान देणार असल्याचीही चर्चा आहे.Former Karnataka Chief Minister Yeddyurappa will demonstrate his strength by touring the state!

    भाजप सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंह सोमवारी बेंगळुरूला येणार आहेत. वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा करून ते येडीयुरप्पा यांना आपला दौरा रद्द करण्यास सांगणार असल्याचे बोलले जात आहे. अरुण सिंह म्हणाले, मी तीन दिवस कर्नाटकात आहे. काही संघटनात्मक समस्या सोडवण्यासह विविध मुद्दे अजेंड्यावर आहेत.



     

    अरुणसिंह म्हणाले की, येडियुरप्पा यांच्या दौऱ्याबाबत भाजपला कोणताही संदेह नाही. येडियुरप्पा हे सर्वात अनुभवी नेते आहेत. जर त्यांना राज्याचा दौरा करायचा असेल तर स्वागतच आहे. त्याचा फायदा भाजपालाच होणार आहे.

    राज्यातील भाजप सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला होता. मात्र, गेल्या आठवड्यात मालदीवच्या सुट्टीवर परतल्यावर त्यांनी पुन्हा राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले.

    येडीयुरप्पा यांनी नुकतीतग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के एस ईश्वरप्पा यांची शिवमोगा येथे भेट घेतली. विशेष म्हणजे ईश्वरप्पा हे येडियुरप्पा यांच्याविरुद्ध बंड करणारे पहिले मंत्री होते. त्याचबरोबर येडियुरप्पा यांचे पुत्र आणि पक्षाचे उपाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांची या दौºयामागे महत्वाची भूमिका आहे.

    येडियुरप्पा यांच्या गटातील एका नेत्याने सांगितले की, विजयेंद्र पुढील निवडणुकांपूर्वी स्वत: ला प्रस्थापित करू पाहत आहेत. त्यांना मंत्रिपद मिळवण्याचे प्रयत्न आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. मुलाचा मंत्रीमंडळात समावेश व्हावा अशी येडीयुरप्पा यांची इच्छा आहे.

    Former Karnataka Chief Minister Yeddyurappa will demonstrate his strength by touring the state!

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका