वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी हे पक्षात कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्यासारख्या तरुणांचा समावेश करून त्यांना अधिकारपदे बहाल करण्याच्या बेतात आहेत. पक्षात मोठ्या प्रमाणावर फेररचना करण्याची त्यांची इच्छा असल्याचे ते अशा कृतीतून सूचित करत आहेत. परंतु पक्षाचे जेष्ठ नेतेच त्यांच्या फेररचनेच्या मनसुब्यास सुरुंग लावताना दिसत आहेत. Former Karnataka Chief Minister turned down Rahul Gandhi’s offer
राहुल गांधी यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काँग्रेसच्या केंद्रीय राजकारणात येऊन पक्षाचे सरचिटणीस पद स्वीकारण्याची सूचना केली होती. परंतु ती त्यांनी नाकारली आहे. ही माहिती खुद्द सिद्धरामय्या यांनी दिल्लीत पत्रकारांना दिली. माझे राजकारणाचे क्षेत्र कर्नाटकापुरते मर्यादित आहे. मी तेथेच राहून राजकारण करू इच्छितो, असे त्यांनी स्पष्ट केले.
सिद्धरामय्या हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षात अहमद पटेल यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांना आणि एकूण गांधी परिवाराला राजकीय सल्लागाराची उणीव भासत आहे. या पार्श्वभूमीवर कदाचित राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांना पक्षाच्या केंद्रीय पातळीवर येऊन सरचिटणीस पद स्वीकारण्याची सूचना केली असावी, असे पक्षाच्या वरिष्ठ गोटातून सांगण्यात येत आहे परंतु सिद्धरामय्या यांनी मात्र ही ऑफर नाकारून स्वतःला कर्नाटकापुरते मर्यादित करून घेतले आहे, असे स्पष्ट होत आहे.
अहमद पटेल यांची राजकीय सल्लागाराची जागा घेण्यासाठी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत यांच्यात देखील सुप्त चुरस असल्याची काँग्रेसच्या वर्तुळात चर्चा आहे. परंतु या तीनही व्यक्तींना डावलून राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांची काँग्रेसच्या केंद्रीय राजकारणासाठी निवड केली असू शकते, असे काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात बोलले जात आहे.
सिद्धरामय्या हे वयाने ज्येष्ठ आहेतच. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलामध्ये देखील त्यांची कारकीर्द दीर्घ राहिली आहे. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद नाकारल्यामुळे सिद्धरामय्या यांनी काँग्रेस पक्षाचा हात धरला. कर्नाटकात पाच वर्षे यशस्वी कारकीर्द चालवून दाखविली. या पार्श्वभूमीवर त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन कदाचित राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांना केंद्रीय राजकारणात आणण्याचा आणि कर्नाटकचे राजकारण नव्या नेतृत्वाच्या हाती सोपविण्याचा मनसुबा ठेवला असू शकतो, अशीही काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात चर्चा आहे. परंतु खुद्द सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी यांची ही ऑफर नाकारून राहुल यांच्या पक्षाच्या संपूर्ण फेररचनेच्या मनसुब्यावर पाणी फिरवल्याचे दिसते.
Former Karnataka Chief Minister turned down Rahul Gandhi’s offer
महत्त्वाच्या बातम्या
- Drugs Case : शर्लिन चोप्राचे शाहरुख खानवर गंभीर आरोप, म्हणाली- बॉलीवूड स्टार्सच्या बायका त्यांच्या पार्ट्यांमध्ये ‘व्हाइट पावडर’ घ्यायच्या
- थॉमस नावाच्या ‘हॅकर’मुळे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप झाले होते ठप्प, आता अमेरिकेची एफबीआय मागावर
- Priyanka Gandhi Arrested : प्रियांका गांधींना अटक, शांतता भंग आणि कलम -144 चे उल्लंघन केल्याचा आरोप
- प्रियांका गांधी केंद्रस्थानी येत असल्याने अखिलेश यादव अस्वस्थ; निघाले उत्तरप्रदेशच्या रथयात्रेवर!!
- ‘तुम्ही शांततेची चर्चा करता, तिकडे तुमचे पंतप्रधान ओसामाला शहीद म्हणतात’ भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला फटकारले ।