देशात कोरोना महामारीचा उद्रेक असतानाही मोदी सरकारच्या व्यवसाय सुलभता धोरणामुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यता थेट परकीय गुंतवणूक गेल्या वर्षीपेक्षा ३८ टक्यांनी वाढली आहे. यंदाच्या वर्षी ६,२४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी गुंतवणूक होती. गेल्या वर्षी ४.५३ अब्ज डॉलर्स गुंतवणूक झाली होती.Foreign investors’ confidence in Modi government, business facilitation policy also increased foreign investment in Corona by 38%
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीचा उद्रेक असतानाही मोदी सरकारच्या व्यवसाय सुलभता धोरणामुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यता थेट परकीय गुंतवणूक गेल्या वर्षीपेक्षा ३८ टक्यांनी वाढली आहे. यंदाच्या वर्षी ६,२४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी गुंतवणूक होती. गेल्या वर्षी ४.५३ अब्ज डॉलर्स गुंतवणूक झाली होती.
थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) धोरणात सुधारणा, गुंतवणूकीची सुविधा आणि व्यवसाय सुलभता या आघाड्यांवर केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे देशात थेट परकीय गुंतवणूकीचा ओघ वाढला आहे. भारताच्या थेट परकीय गुंतवणूकीमधील खालील कल ही जागतिक गुंतवणूकदारांमध्ये पसंतीचे गुंतवणूक केंद्र भारताच्या दजार्ला मिळालेली मान्यता आहे
एप्रिल 2021 मध्ये भारताने 6.24 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित केली आणि ती एप्रिल 2020 च्या तुलनेत 38% जास्त आहे. एप्रिल 2021 मध्ये देशात इक्विटीचा ओघ 4.44 अब्ज डॉलर्स इतका नोंदवला गेला होता, जो एप्रिल 2020 च्या (वर$ 2.77 अब्ज ) तुलनेत 60 टक्क्यांनी वाढला आहे.
एप्रिल 2021 मध्ये एफडीआय इक्विटीच्या 24% गुंतवणूकीसह मॉरिशस सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश आहे, त्याखालोखाल सिंगापूर (21%) आणि जपान (11%) आहे. एप्रिल 2021 मध्ये संगणक सॉफ्टवेअर व हार्डवेअर हे अव्वल क्षेत्र म्हणून उदयास आले असून एकूण एफडीआय इक्विटी प्रवाहात त्याचा वाटा सुमारे 24% आहे, त्याखालोखाल सेवा क्षेत्र (23%) आणि शिक्षण क्षेत्र (8%) आहे.
एप्रिल 2021 मध्ये कर्नाटकमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आली. जी एकूण एफडीआय इक्विटीच्या 31% आहे, त्याखालोखाल महाराष्ट्र (19 %) आणि दिल्ली (15 टक्के ) आहे.
यूएन कॉन्फरन्स ऑन ट्रेड डेव्हलपमेंटच्य अहवालानुसार २०२० मध्ये भारत जगातील पाचवा सर्वात मोठा परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा देश होता. २०२० मध्ये परकीय गुंतवणूक २७ टक्यांनी वाढून ६४ अब्ज डॉलर्स पोहोचली होती. २०१९ मध्ये ती ५१ अब्ज डॉलर्स होती.
देशाला कोरोनाच्या दोन्ही लाटांचा मोठा फटका बसला. त्यामुळ अर्थचक्र मंदावले होते. परंत, या काळात मोदी सरकारने उद्योगस्रेही वातावरण तयार केले. भ्रष्टाचार निपटून काढून व्यवसाय सुलभ वातावरण तयार केले. त्यामुळे मोदी सरकारवरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.
Foreign investors’ confidence in Modi government, business facilitation policy also increased foreign investment in Corona by 38%
महत्वाच्या बातम्या
- घरपोच दारू मागविताना शबाना आझमी यांची झाली फसवणूक
- ओबीसी आरक्षणावरून नणंद- भावजयांत जुंपली, रोहिणी आणि रक्षा खडसे आमने-सामने
- वाकायला सांगितले, ते गुडघ्यावर बसले…!! हिमालयाच्या मदतीला गेलेले सह्याद्रीही अपवाद नव्हते…!!
- नेहरू – पटेलांचे नाव घेत मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्लांचा ५ ऑगस्ट २०१९ पूर्वीचाच सूर; ३७० कलमासाठी संघर्ष करण्याची मांडली भूमिका