विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा लष्करप्रमुखपदाचा मान मिळणार आहे. नागपूरचे सुपूत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड झाली आहे. ते विद्यमान लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांची जागा घेतील. नरवणे 30 एप्रिल रोजी आपल्या पदावरुन सेवानिवृत्त होणार आहेत. जनरल पांडे सध्या उप लष्करप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या रुपात प्रथमच लष्कराच्या सर्वोच्च स्थानी एखादा अभियंता विराजमान आहे.For the second time in a row, Maharashtra will be honored with the post of Army Chief, Nagpur’s son will be the new Army Chief
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे सध्या उप लष्करप्रमुख म्हणून सैन्याचे नेतृत्व करतात. त्यांनी गत 1 फेब्रुवारी रोजी या पदाची सूत्रे हाती घेतली होती. ते 1982 साली लष्कराच्या कोअर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये भरती झाले. आपल्या जवळपास 40 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत पांडे यांनी अनेक आव्हानात्मक जबाबदाºया पार पाडल्या.
त्यांनी स्ट्राइक कॉर्प्सचा एक भाग म्हणून अभियंता ब्रिगेड, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पायदळ ब्रिगेड आणि उंचावरील माउंटन डिव्हिजनचे नेतृत्व केले. लेफ्टनंट कर्नल म्हणून ते इथिओपिया आणि एरिट्रियामधील संयुक्त राष्ट्रांच्या मिशनचा एक भाग होते. लष्कराच्या मुख्यालयातील मिलिटरी ऑपरेशन डायरेक्टोरेटमध्ये अतिरिक्त महासंचालकपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे.
आता ते 29 वे लष्करप्रमुख म्हणून लष्कराची सूत्रे सांभाळतील.अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित झालेले मनोज पांडे मूळचे नागपूरचे आहेत. ते कन्सल्टिंग सायकोथेरपिस्ट आणि नागपूर विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख सी. जी. पांडे आणि दिवंगत प्रेमा पांडे यांचे सुपूत्र आहेत.
त्यांच्या आई प्रेमा ऑल इंडिया रेडिओत निवेदिका होत्या. मनोज पांडे यांचे धाकटे बंधू संकेत हे देखील भारतीय लष्करात होते. ते कर्नल म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या पत्नी अर्चन गृहिणी आहेत. मुलगा फ्लाईट लेफ्टनंट अक्षय भारतीय हवाईदलात वैमानिक म्हणून कर्तव्य बजावीत आहे. मनोज पांडे यांनी भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मुख्यालयात चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
For the second time in a row, Maharashtra will be honored with the post of Army Chief, Nagpur’s son will be the new Army Chief
महत्त्वाच्या बातम्या
- इन्फोसिसचे शेअर्स ६.८९ टक्क्यांनी घसरले
- Raj Thackeray : एकीकडे राज ठाकरेंना धमक्या; दुसरीकडे भोंगे परवानगीसाठी मुस्लिम संघटनांची धावपळ!!
- Pawar NCP Karnataka : शरद पवारांचा कर्नाटक दौरा; पण राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी?? की काँग्रेस पोखरण्यासाठी…??
- शालेय विद्यार्थ्यांना सुपरमाईंड फाऊंडेशनतर्फे मोफत मार्गदर्शन