विशेष प्रतिनिधी
डेहराडून : मिस इंडिया राहिलेल्या सुनेची उमेदवारीची इच्छा पूर्ण करण्यासाठी उत्तराखंडमध्ये मंत्र्याने मंत्रीपदही पणाला लावले. सुनेची विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हरक सिंह रावत यांनी शेवटी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.For Miss India daughter in law minister resigned, model in Uttarakhand became Congress candidate
उत्तर प्रदेशातील जुगाडू नेता म्हणून प्रसिध्द असलेले हरकसिंह रावत आत्तापर्यंत कोणीही मुख्यमंत्री असेल तरी मंत्रीपद मिळविण्यात यशस्वी होत होते. मात्र, भाजपने त्यांची घराणेशाही चालू दिली नाही. त्यामुळे रावत यांनी भाजप सोडला. रावत यांच्या मुलाला राजकारणात येण्याची इच्छा नाही. मात्र, त्यांची सून राजकारणात खूप रस घेते.
अनुकृती रावत ही त्यांची सून एक मॉडेल आणि टीव्ही स्टार आहे. मिस इंडिया स्पर्धेतही तिने क्रमांक मिळविला होता. अनुकृतीला उमेदवारी देण्यासाठी रावत आग्रही होते. त्यामुळे उत्तराखंडमधील पुष्करसिंह धामी सरकारमधून मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा देत बंडाचा पवित्रा घेणारे हरकसिंह रावत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.त्यांच्यासह त्यांची सून अनुकृती हीसुद्धा काँग्रेसमध्ये गेली आहे.
२०१६ मध्ये हरिश रावत यांचे सरकार जाण्यात हरकसिंह यांचे बंड हे मोठे कारण ठरले होते. तो राग हरीश रावत यांच्या मनात होता. मात्र, इतर नेत्यांनी हरीश रावत यांची समजूत काढल्यानंतर हरकसिंह यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे पुन्हा खुले करण्यात आले. हरीश रावत यांच्या उपस्थितीतच हरकसिंह यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला.
यावेळी हरकसिंह यांनी भाजपवर तोफ डागली. भाजपने मला ‘युज अँड थ्रो’ अशी वागणूक दिली. मला खूप त्रास देण्यात आला. आता मला माझी चूक सुधारायची असून १० मार्चला उत्तराखंडमध्ये काँग्रेसचं पूर्ण बहुमतातलं सरकार आणायचं हेच माझं लक्ष्य असणार आहे, असे हरकसिंह म्हणाले.
हरकसिंह रावत हे उत्तराखंडच्या राजकारणातील मोठे नाव असून त्यांचा राजकीय प्रवासही चक्रावून टाकणारा आहे. त्यांनी अनेक पक्ष बदलले आणि स्वत:चा पक्ष स्थापन करण्याचा प्रयोगही केलेला आहे. पहिली निवडणूक ते भाजपच्या तिकिटावर लढले होते. त्यानंतर १९९६ मध्ये ते बसपात गेले. मायावती यांचे ते विश्वासू होते. मात्र १९९८ मध्ये पुन्हा त्यांनी पक्ष बदलला आणि काँग्रेसची वाट धरली.
उत्तराखंडची स्थापना झाल्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये ते मंत्री होते. २००७ मध्ये त्यांना काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदही दिले होते. २०१६ मध्ये हरकसिंह यांनी पुन्हा बंड केले आणि ते भाजपमध्ये गेले. त्यानंतर विद्यमान धामी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. मात्र सरकारवरील नाराजीतून त्यांनी मंत्रिपद सोडले.
विशेष म्हणजे १९९१ पासून आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही विधानसभांत त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेसच्या तीन मुख्यमंत्र्यांसोबत आणि भाजपच्या तीन मुख्यमंत्र्यांसोबत ते मंत्रिमंडळात राहिले आहेत.
For Miss India daughter in law minister resigned, model in Uttarakhand became Congress candidate
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तरेकडील शीत लहरीचा रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम
- अमेरिकेत पीएचडीसाठी डिसले गुरुजींचा अध्ययन रजेचा अर्ज; शिक्षणाधिकाऱ्यांचा सवाल, शाळेचे काय करणार, पर्याय सुचवा!
- केंद्र सरकारकडून आणखी 35 यूट्यूब चॅनेल ब्लॉक, अँटी इंडिया कंटेंटमुळे कारवाई
- इंडिया गेट मध्ये नेताजींचा पुतळा : नेताजींच्या कन्या अनिता बोस पफ यांना आनंद!!
- Lakhimpur Kheri Case : भाजप कार्यकर्ते आणि चालकाच्या हत्येप्रकरणी शेतकऱ्यांविरुद्ध आरोपपत्र, ३ जणांना दिलासा