• Download App
    Foodgrain output hit record 308m tonnes ; Production of oilseeds pulses Increased, Modi government's Policy Is Successful

    अन्नधान्यांचे देशात विक्रमी उत्पादन; तेलबियांसह डाळींच्या उत्पादन वाढ, मोदी सरकारचे धोरण यशस्वी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली: भारतात गेल्या वर्षभरात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. म्हणजेच २०२०- २१ मध्ये ३०८ दशलक्ष टन धान्याचे उत्पादन झाले, त्या अगोदरच्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा ते ३.७ टक्के जास्त आहे, असे कृषी मंत्रालयाने बुधवारी सांगितले. शेतकरी हितासाठी आणि उत्पादन वाढीसाठी केंद्रातील मोदी सरकारने राबविलेल्या धोरणांचे हे यश मानले जात आहे. Foodgrain output hit record 308m tonnes ; Production of oilseeds pulses Increased, Modi government’s Policy Is Successful

    अन्नधान्यामधील सर्व प्रमुख पिके (भात, गहू, मका आणि हरभरा) आणि तेलबिया पिकांचे वर्षात विक्रमी उत्पादन झाले आहे. केंद्र सरकारने तेलबियांच्या उत्पादनाकडे अधिक लक्ष केंद्रित केले होते. तसेच लागवडीसाठी प्रोत्साहन दिल्यामुळे तेलबियांचे उत्पादन ९ % पेक्षा जास्त आणि डाळींच्या उत्पादनात ८ % पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली. २०२०- २१ (जुलै-जून सायकल) साठी प्रमुख कृषी पिकांच्या उत्पादनाचा चौथा आगाऊ अंदाज जाहीर करताना, मंत्रालयाने म्हटले आहे की, अन्नधान्याचे उत्पादन २०१९.२० मधील उत्पादनापेक्षा ११ दशलक्ष टन (एमटी) जास्त आणि पाच वर्षांचे (२०१५-१६ ते २०१९-२०) अन्नधान्याचे सरासरी उत्पादन हे सुमारे ३० एमटीने जास्त आहे.



    धान्य उत्पादनाचा चौथा अंदाज अंतिम अंदाजाच्या जवळ मानला जातो. जो पुढील दोन महिन्यांत जारी केला जाऊ शकतो. यापूर्वी मे महिन्यात मंत्रालयाने जारी केलेल्या तिसऱ्या अंदाजानुसार ३०५ मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज लावला होता. भारताने २०१९- २० मध्ये २९७ मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन केले होते.

    विशेष म्हणजे कोरोनाचे आव्हान ते पेलताना शेतकऱ्यांनी जास्त एकर क्षेत्रात लागवड केली.गेल्या वर्षी चांगल्या मान्सूनच्या पावसामुळे जास्त उत्पादन मिळाले. शेतकर्‍यांच्या अथक परिश्रमामुळे, कृषी शास्त्रज्ञांचे कौशल्य आणि सरकारच्या कृषी आणि शेतकरी अनुकूल धोरणांमुळे विक्रमी अन्नधान्याचे उत्पादन होत आहे, असे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. चौथ्या अंदाजानुसार, २०२०-२१ मध्ये तांदळाचे उत्पादन १२२ मेट्रिक टन होते, जे मागील वर्षी ११९ मेट्रिक टन होते.

    Foodgrain output hit record 308m tonnes ; Production of oilseeds pulses Increased, Modi government’s Policy Is Successful

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य