वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तान सध्या पूर आणि पावसाचा सामना करत आहे.पुरामुळे तिथे 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. काही अहवालांमध्ये 304 आणि 314 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. दक्षिण-पश्चिम प्रांतात बलुचिस्तानमध्ये सर्वाधिक 111 मृत्यू झाले आहेत. कराची, पंजाब, सिंध प्रांतात देखील परिस्थिती गंभीर आहे.Floods in Pakistan 300 dead in one month, high alert in 10 districts
हवामान खात्याने इशारा दिला असून 31 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बलुचिस्तानमधील 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
10,000 घरे उध्वस्त
देशाचे मुख्य सचिव अब्दुल अजय अकीलीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे बलुचिस्तानमध्ये सर्वात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे सुमारे 10 हजार घरांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर 16 बंधाऱ्यांच्या भिंतींनाही तडे गेले आहेत. 2,400 सोलर पॅनलचेही नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे रस्त्यांचे नुकसान
मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे सुमारे 650 किमी रस्त्याचे नुकसान झाले आहे. कराची ते क्वेटा हा मार्ग बंद करण्यात आला आहे. लोकांना समस्यांचा सामना करावा लागत असून त्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जात असल्याचे अकीलीक म्हणाले.
पाकिस्तानात मान्सून साधारणपणे जून ते सप्टेंबरपर्यंत असतो. हा मान्सून शेतीसाठी फायद्याचा असतो परंतु दरवर्षी पूर देखील याच वेळी येतो. परिस्थिती इतकी बिकट होते की, शेकडो हेक्टर शेतजमीन नष्ट होते. ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्सच्या अहवालानुसार, पाकिस्तान हा पर्यावरणाच्या दृष्टीने आठव्या क्रमांकाचा असुरक्षित देश आहे.
Floods in Pakistan 300 dead in one month, high alert in 10 districts
महत्वाच्या बातम्या
- दिल्ली हायकोर्टाचे काँग्रेस नेत्यांना आदेश : स्मृती इराणींच्या मुलीवर केलेल्या सर्व सोशल मीडिया पोस्ट हटवा
- सोन्याची आयात होणार सुलभ : देशाला मिळाले पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
- शरद पवारांची शिंदे-फडणवीसांवर टीका : दुष्काळ दौरे सोडून राज्यकर्ते स्वागत सोहळ्यात मश्गूल
- अधीर रंजन चौधरींनी पत्र लिहून मागितली राष्ट्रपती मुर्मूंची माफी, भाजपचा पवित्रा- सोनियांनी माफी मागितल्यानंतरच कामकाज चालेल