वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आसाममध्ये गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखीनच बिकट बनली आहे. आसामच्या 10 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. राज्यातील एक लाखाहून अधिक लोकांना आपली घरे आणि जमीन सोडून छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. हवामान खात्याने अतिमुसळधार पावसाचा अंदाज घेऊन ऑरेंज अलर्ट दिला आहे. ब्रह्मपुत्रेची उपनदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.Flood situation in Assam, Monsoon likely to reach Mumbai today, Meteorological department alert
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज
मान्सून तळकोकणातच अडकला असून त्याच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे. परंतु, सध्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत आज मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड, तेलंगण येथे उष्णतेची लाट कायम राहील.
तामिळनाडू वगळता दक्षिण भारतात 60% ते 80% पावसाची कमतरता आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचा मध्य आणि पूर्व भागदेखील कोरडा आहे. या राज्यांमध्ये पावसाची तूट 80%-90% पर्यंत वाढली आहे.
Flood situation in Assam, Monsoon likely to reach Mumbai today, Meteorological department alert
महत्वाच्या बातम्या
- मायक्रोन गुजरातमध्ये उभारणार पहिला सेमीकंडक्टर प्लांट; 6,700 कोटींच्या गुंतवणुकीने 5,000 नोकऱ्यांची निर्मिती
- ‘’राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांनी टोळीयुद्ध दिसणार’’ आशिष शेलारांचं भाकीत!
- बंगाल के माजी मुख्यमंत्री बुद्धदेव यांची कन्या होणार पुरुष, सुचेतना सेक्स चेंज केल्यानंतर सुचेतन बनणार
- ‘टायटॅनिक’चे अवशेष शोधण्यास गेलेल्या पाणबुडीचा स्फोट, सर्व पाच जणांचा मृत्यू