विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : एकेकाळी दहशतवाद्यांची दहशतीखाली असलेल्या काश्मीर खोऱ्या त पाच मैत्रीणींनी दहशतवादाला नाकारत सुफी संगीताच्या सुरांची बरसात सुरू केली आहे. या पाच जणी सुफियाना संगीतात नवे प्राण फुंकत आहे.Five girlfriends start rain of Sufi music in Kashmir Valley rejecting terrorism in the
समाजाकडनू होणारा अपमान, नातेवाईकांचा विरोध आणि कुटुंबियांची नाराजी असूनही पाच मैैत्रीणी संगीताच्या सेवेसाठी एकत्र आल्या आहेत. बांडीपोरा जिला ज्ञान, शालीनता आणि गोड्या पाण्याचे सरोवर असलेल्या बुल्लरसाठी प्रसिध्द आहे. बांडीपोरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या गनसतान गावातील पाच मैैत्रीणी इरफाना यूसुफ, रिहाना यूसुफ, गुलशन लतीफ, शबनम बशीर आणि साइमा हमीद एकत्र आल्या.
त्यांनी आपल्या ग्रुपचे नाव यमबरजल ठेवले आहे. काश्मीरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बहरणाऱ्या छोट्या छोट्या पिवळ्या रंगाच्या फुलांना यमबरजल असे म्हटले जाते.२३ वर्षीय इरफाना आणि तिची बहिण इरफाना सुफी संगीतातील महत्वाचे वाद्य असलेले संतूर वाजवतात. बाकी मैैत्रीणी तबला, सितार, साज-ए-कश्मीरने साथ देतात.
हा ग्रुप आता काश्मीरची नवी ओळख बनला आहे. काश्मीरी मुलींचा हा पहिला संगीत ग्रुप मानला जात आहे. आता केवळ काश्मीरच नव्हे तर देश-विदेशात या ग्रुपने ओळख मिळविली आहे.
Five girlfriends start rain of Sufi music in Kashmir Valley rejecting terrorism in the
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकांआधी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला, युवक शाखेच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा
- सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी कॉलेजियमच्या नावांना केंद्राची मान्यता, 3 महिला न्यायाधीशांचा समावेश
- Bengal Post Poll Violence : सीबीआयने 9 केसेस नोंदवल्या; लवकरच तृणमूल नेते आणि कार्यकर्त्यांच्या चौकशीची शक्यता
- All Party Meeting : अफगाणिस्तानवर सर्वपक्षीय बैठकीत साडेतीन तास विचारमंथन; जयशंकर म्हणाले – परिस्थिती अद्याप ठीक नाही, 565 जणांना आणले