माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी निदर्शने सुरू होती.
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ ( Tehreek e Insaf ) (पीटीआय) ने रविवारी काढलेल्या रॅलीत गदारोळ झाला. सरकारवर दबाव टाकण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान हा गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.
पीटीआयने या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला असून, सरकारने पक्षाचा आवाज दाबल्याचा आरोप केला आहे आणि परिस्थितीला अघोषित मार्शल लॉ म्हणून संबोधले आहे.
तर इस्लामाबादमधील या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. याठिकाणी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.
या घटनेवर इम्रानच्या पक्षाने म्हटले की, शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या पोलिसांना लाज वाटली पाहिजे. इस्लामाबादचे आयजी आणि सरकारने असे निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे. आज जनतेने सरकारला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Firing at a rally of Pakistan Tehreek e Insaf in Islamabad
महत्वाच्या बातम्या
- Congress : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अन् ‘आप’चं अखेर जुळलं!
- Manoj jarange + Sambhji Raje : जरांगे + संभाजीराजे : चर्चा तिसऱ्या आघाडीची; पण निवडणुकीनंतरच्या समीकरणात सत्ता भरती कुणाची??
- Sharad Pawar : गुरुने दिला छुपा हा वसा; जरांगेंच्या तोंडी फक्त पाडण्याची भाषा!!
- Dalpati Vijay : दलपती विजय तमिळनाडूत 2026च्या निवडणुकीच्या लढाईत उतरण्यास तयार