• Download App
    Mahadalit Tola बिहारमधील नवादामधील महादलित टोला येथे गोळीबार

    Mahadalit Tola : बिहारमधील नवादामधील महादलित टोला येथे गोळीबार अन् 80 घरे पेटवली

    Mahadalit Tola

    या घटनेत अनेक गुरे जळून ठार झाली आहेत, तर पीडित गावकऱ्यांनी मारहाणीचा आरोपही केला


    विशेष प्रतिनिधी

    नवादा : बिहारमधील नवादा येथील महादलित टोला  ( Mahadalit Tola ) येथे बुधवारी गुंडांनी सुमारे 80 घरांना आग लावली, त्यानंतर मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. हे संपूर्ण प्रकरण मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या घटनेत अनेक गुरे जळून ठार झाली. पीडित गावकऱ्यांनी गोळीबार आणि मारहाणीचा आरोपही केला आहे.

    ही संपूर्ण घटना जिल्ह्यातील मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देदौर कृष्णा नगरमध्ये घडली. नदीकाठावरील बिहार सरकारी जमिनीवर राहणाऱ्या लोकांच्या घरांना आग लागली आहे. गावात संतापाची लाट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहोचले आणि अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली.



    त्याचवेळी सदर एसडीओ अखिलेश कुमार, एसडीपीओ अनोज कुमार, एसडीपीओ सुनील कुमार यांच्यासह मोफसिल, नगर, बुंदेलखंडसह अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस तेथे पोहोचले. या घटनेबाबत पीडित गावकऱ्यांनी आरोप केला की, बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास प्राण बिघा येथील नंदू पासवान शेकडो लोकांसह गावात पोहोचले आणि त्यांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. दरम्यान, अनेक गावकऱ्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर 80-85 घरांना आग लागली.

    या आगीत अनेक गुरे जळून खाक झाल्याचे पीडित गावकऱ्यांनी सांगितले. घरातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. लोकांना खाण्यापिण्याची, निवाऱ्याची समस्या भेडसावत आहे. अचानक घडलेल्या प्रकारामुळे लोकांना काहीच समजले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

    Firing and burning of 80 houses in Mahadalit Tola in Nawada Bihar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट