• Download App
    स्मृती इराणींना पाकिस्तानी संबोधल्याप्रकरणी काँग्रेस नेत्याविरोधात अमेठीमध्ये FIR दाखल FIR filed in Amethi against Congress leader for calling Smriti Irani Pakistani

    स्मृती इराणींना पाकिस्तानी संबोधल्याप्रकरणी काँग्रेस नेत्याविरोधात अमेठीमध्ये FIR दाखल

    भाजपा नेते केशव सिंह यांनी गौरीगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

    विशेष प्रतिनिधी

    अमेठी : काँग्रेसचे माजी आमदार आणि अमेठीचे नेते दीपक सिंह यांच्या अडचणी वाढू शकतात. अमेठीतील गौरीगंज पोलीस स्टेशन परिसरात दीपक सिंह विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. FIR filed in Amethi against Congress leader for calling Smriti Irani Pakistani

    भाजपा नेते केशव सिंह यांनी गौरीगंज पोलीस ठाण्यात काँग्रेसचे माजी आमदार दीपक सिंह यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून काँग्रेस नेत्याने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केल्याची माहिती मिळत आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी दीपक सिंगविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    काँग्रेस नेते दीपक सिंह हे त्यांच्या समर्थकांसह गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत होते. संजय गांधी रुग्णालयाचा परवाना निलंबित केल्याच्या विरोधात ते आंदोलन करत होते. आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांच्यावर टीका केली आणि त्यांना पाकिस्तानी म्हटले.

    FIR filed in Amethi against Congress leader for calling Smriti Irani Pakistani

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली